शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 10:57 IST

विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; कामासाठी गेलेल्या भारतीयांची चिंता वाढली

ठळक मुद्देकुवेतमध्ये अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरीलवकरच अप्रवासी कोटा विधेयकही मंजूर होण्याची शक्यताविधेयक मंजूर झाल्यास ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

नवी दिल्ली: परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी कुवेतनं सुरू केली आहे. त्यामुळे देशातील परदेशी कामगारांच्या संख्येत कपात होईल. या विधेयकाच्या मसुद्याला कुवेतच्या संसदेत मंजुरी मिळाली आहे. हा मसुदा पूर्णपणे घटनेला धरून असल्याचं विधेयक समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच कुवेतच्या संसदेत अप्रवासी कोटा विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे.अप्रवासी कोटा विधेयक आणखी एका समितीकडे जाणार आहे. मात्र यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या अतिशय मोठी आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास ७ ते ८ लाख भारतीयांवर नोकरी गमावण्याची वेळ येईल. कुवेतमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी व्यक्तींची आकडेवारी पाहिल्यास त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कुवेतची लोकसंख्या ४८ लाख इतकी आहे. यातील भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर यापैकी १५ टक्केच लोकांना कुवेतमध्ये राहता येईल. त्यामुळे ७ ते ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागेल. भारतीयांसोबतच इतर देशांमधून कुवेतमध्ये काम करण्यास गेलेल्या व्यक्तींनादेखील याचा फटका बसेल. इजिप्तमधून आलेल्या व्यक्तींची संख्या ९० टक्क्यांनी कमी करण्याची तरतूद मसुद्यात आहे. भारतीयांनंतर कुवेतमध्ये इजिप्तच्या व्यक्तींचं प्रमाण सर्वाधिक आहे.कुवेतमध्ये नोकरी करण्यासाठी गेलेले भारतीय त्यांच्या कुटुंबाना मोठ्या प्रमाणात पैसा पाठवतात. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळतं. २०१८ मध्ये कुवेतमधून भारतात ४.८ बिलियन डॉलर इतकी रक्कम पाठवली गेली. त्यामुळे अप्रवासी कोटा विधेयकाला मंजुरी मिळाल्यास परकीय चलनाच्या गंगाजळीवर परिणाम होईल. कुवेतमधील परदेशी व्यक्तींची संख्या वाढल्यानं देशात मूळ कुवेती व्यक्तींची संख्याच कमी झाली आहे. त्यामुळे कुवेती त्यांच्याच देशात अल्पसंख्याक होऊ लागले आहेत. ही बाब समोर आल्यानं कुवेतनं अप्रवासी कोटा विधेयक आणण्याची तयारी सुरू केली आहे. परदेशातील कर्मचाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कुवेतनं प्रयत्न सुरू केले आहेत. कुवेतची लोकसंख्या ४३ लाख इतकी आहे. त्यामध्ये परदेशातून आलेल्या लोकांचं प्रमाण ३० लाख इतकं आहे.