अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बगराम हवाई दल तळावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा दावा केला होता, त्या वक्तव्याला तालिबान सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. 'जर अफगाणिस्तानने त्याचे पालन केले नाही तर त्यांना तिथे काय करायचे आहे हे त्यांना कळेल', ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे. ट्रम्प यांच्या धमकीला तालिबानने जोरदार प्रत्युत्तर दिले.
बगराम हवाई तळ हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भाग आहे आणि तो कोणत्याही परदेशी शक्तीला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बग्राम हवाई तळ हा एकेकाळी अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीचे सर्वात प्रमुख प्रतीक होता. २०२१ मध्ये अमेरिकेच्या अचानक आणि अव्यवस्थित माघारीनंतर, तालिबानने तळावर ताबा मिळवला.
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
'बगराम हवाई तळ हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भाग आहे आणि तो कोणत्याही परदेशी शक्तीला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही', असे प्रत्युत्तर अफगाणिस्तानने दिले आहे. बगराम हवाई तळ हा एकेकाळी अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीचे सर्वात प्रमुख प्रतीक होते. २०२१ मध्ये अमेरिकेच्या अचानक माघारीनंतर, तालिबानने तळावर ताबा मिळवला.
"अमेरिकेने वास्तववादी धोरण स्वीकारावे"
तालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी ट्रम्प यांच्या दाव्याला "तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे" म्हटले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'वर लिहिले की, "अफगाणिस्तानचे परराष्ट्र धोरण आर्थिक हितसंबंध आणि सामायिक सहकार्यावर आधारित आहे. आम्ही सर्व देशांना आदर आणि परस्पर हितसंबंधांवर आधारित आमच्याशी संबंध निर्माण करण्याचे आवाहन करतो."स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता ही अफगाणिस्तानची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अनेक द्विपक्षीय चर्चेत हे अमेरिकेला स्पष्टपणे कळवण्यात आले आहे.", असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दोहा करार
दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्यांनी दोहा कराराचा उल्लेख केला. "अमेरिकेने या करारात अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेविरुद्ध बळाचा वापर न करण्याचे किंवा त्यांच्या राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे वचन दिले आहे." अमेरिकेने आपल्या वचनबद्धतेचे पालन करावे अशी मागणी त्यांनी केली.