इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतःच्या निधनाबाबत पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला. इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेने नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या दाव्यांचे खंडन करण्यासाठी नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यात त्यांनी आपली दहाही बोटे मोजून दाखवली आहेत.
इराणच्या प्रसारमाध्यमांनी असा दावा केला होता की, नेतन्याहू बऱ्याच काळापासून कुठेच दिसलेले नाहीत. त्यांनी असाही आरोप केला होता की, इस्रायलने नेतन्याहू यांचा एक एआय निर्मित व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या एका हाताला सहा बोटे दिसत असल्याचा पुरावा त्यांनी दिला होता.
या विचित्र आरोपांना उत्तर देताना नवीन व्हिडिओमध्ये नेतन्याहू एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने अफवांबद्दल विचारले असता, नेतन्याहू यांनी हसत आपले दोन्ही हात कॅमेऱ्यासमोर धरले आणि विचारले, तुम्हाला माझी बोटे मोजायची आहेत का? त्यानंतर त्यांनी स्वतःची दहाही बोटे मोजून दाखवून ते पूर्णपणे ठणठणीत असल्याचे सिद्ध केले.
एककीडे हा व्हिडिओ वॉर सुरू असताना दुसरीकडे प्रत्यक्ष युद्धभूमीवर इस्रायलने इराणवर हल्ले तीव्र केले. राजधानीवरील हल्ल्यानंतर आता इराणचे प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या इस्फाहानला लक्ष्य करण्यात आले. रविवारी पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणमधील कारखाने आणि लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले. या ताज्या हल्ल्यांमध्ये किमान १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिली.
अहवालानुसार, इस्रायलने इराणमधील जवळपास २०० शहरांना लक्ष्य केले असून, यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने २८ फेब्रुवारीपासून सातत्याने नेतन्याहू यांचे निवासस्थान आणि कार्यालयावर बॉम्बफेक झाल्याचे आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे दावे केले होते, जे आता फेल ठरले आहेत.
Web Summary : Benjamin Netanyahu refuted death rumors spread by Iranian media. He released a video, displaying his ten fingers to prove he's alive and well, amid escalating tensions and reported Israeli strikes in Iran.
Web Summary : बेंजामिन नेतन्याहू ने ईरानी मीडिया द्वारा फैलाई गई मौत की अफवाहों का खंडन किया। उन्होंने एक वीडियो जारी किया, जिसमें अपनी दस उंगलियां दिखाकर साबित किया कि वह जीवित और स्वस्थ हैं, बढ़ते तनाव और ईरान में इजरायली हमलों की खबरों के बीच।