शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नेपाळ: ओलींना धक्का; २८ तासांत देउबांना पंतप्रधान करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:49 IST

Nepal Political Crisis: के.पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या ५ महिन्यांत दुसऱ्यांदा संसदेत बहुमत गमावले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने नवीन सरकार बनविण्याचे आदेश दिले आहेत. 

नेपाळमध्ये राजकीय संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीय. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, पुढील २८ तासांत शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांना पुढील पंतप्रधान (Prime Minister of Nepal) केले जावे. यामुळे संसद बरखास्त करणाऱ्या के.पी. ओली यांना मोठा धक्का बसला आहे. (Nepal's Supreme Court has ordered to appoint Sher Bahadur Deuba as Prime Minister within the next 28 hours.)

के.पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या ५ महिन्यांत दुसऱ्यांदा संसदेत बहुमत गमावले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने नवीन सरकार बनविण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यांच्या पीठाने हे आदेश दिले आहेत. २८ तासांच्या आत नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले जावे, असे म्हटले आहे. 

नेपाळचे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मे मध्ये नेपाळची 275 सदस्यांची संसद भंग केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा केली होती. राष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्य न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 

विरोधकांनी न्यायालयात 30 हून अधिक याचिका दाखल केल्या होत्या. यामध्ये राष्ट्रपतींचा आदेश चुकीचा असल्याचे म्हटले होते. यामुळे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबायांना पंतप्रधान केले जावे, अशी मागणी त्यांनी या याचिकांद्वारे केली होती. यावर जवळपास १५० खासदारांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. 

टॅग्स :Nepalनेपाळ