नेपाळचे माजी पंतप्रधान थापा यांचे निधन

By Admin | Updated: April 17, 2015 00:01 IST2015-04-17T00:01:19+5:302015-04-17T00:01:19+5:30

नेपाळचे माजी पंतप्रधान सूर्यबहादूर थापा यांचे गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

Nepal's former Prime Minister Thapa passes away | नेपाळचे माजी पंतप्रधान थापा यांचे निधन

नेपाळचे माजी पंतप्रधान थापा यांचे निधन

नवी दिल्ली : नेपाळचे माजी पंतप्रधान सूर्यबहादूर थापा यांचे गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. बुधवारी रात्री १०.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी त्यांचे पार्थिव मायदेशी नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थापा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. १९९० पूर्वी राजेशाहीच्या काळात तीन वेळा, तर बहुपक्षीय लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर दोनदा ते नेपाळचे पंतप्रधान होते.

Web Title: Nepal's former Prime Minister Thapa passes away