शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:39 IST

नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला.

ठळक मुद्देनेपाळ सरकारने ऐन वेळी संसदेच्या कामकाजातून आज घठना दुरुस्तीची कार्यवाही काढली.नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.नेपाळने भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भूभागांचा समावेश आपल्या नकाशात केला होता. 

नवी दिल्ली : नेपाळने काही दिवसांपूर्वी आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवला होता. यानंतर राजकीय आणि पराष्ट्रसंबंधांमध्ये आलेल्या कटूतेनंतर, आता नेपाळने एक पाय मागे घेतला आहे.

नेपाळकडून जारी करण्यात आलेला नकाशा देशाच्या संविधानात जोडण्यासाठी, आज नेपाळच्या संसदेत घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र, नेपाळ सरकारने ऐन वेळी संसदेच्या कामकाजातून आज घठना दुरुस्तीची कार्यवाही काढून टाकली.

नेपाळमधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या आपसात झालेल्या सहमतीनेच घटना दुरुस्ती विधेयक सध्या संसदेच्या कामकाजातून हटवण्यात आले आहे. नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला.

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

भारतासोबत द्विपक्षीय चर्चेचा मार्ग प्रशस्त करण्याच्या हेतूने नेपाळने हा निर्णय घेतला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळसोबत चर्चा करण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची मागणी केली होती. यावर नेपाळनेही हा नवा नकाशा संसदेद न मांडता मुत्सद्देगिरीचा परिचय  दिला आहे. 

इम्रान खान यांनी पुन्हा ओकली गरळ, चीन-नेपाळच्या आडून मोदी सरकारवर साधला निशाणा

भारताने दिली होती अशी प्रतिक्रिया -नेपाळने आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवल्यानंतर भारतानेही प्रतिक्रिया दिला होती. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले होते, की 'आम्ही नेपाळ सरकारला विनंती करतो, नेपाळ सरकारने, असे बनावट कार्टोग्राफिक प्रकाशित करू नये. तसेच, भारताचे सार्वभौमत्तव आणि क्षेत्रीय अखंडतेचा आदर करावा.'

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

काय आहे प्रकरण :नेपाळ सरकारने नेपाळचा नवा राजकीय नकाशा जारी केला होता. यात त्यांनी भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भूभागांचा समावेश केला होता. 

जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतNepalनेपाळBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली