Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:43 IST2025-09-09T16:39:39+5:302025-09-09T16:43:00+5:30

Nepal Protest : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. ही निदर्शने कालपासून तीव्र झाली आहेत.

Nepal Protest Impact of the agitation in Nepal on the border, the situation is tense on the border; Indian tourists stopped | Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले

Nepal Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात मागील काही दिवसांपासून निदर्शने सुरू होती. ही निदर्शने आता हिंसक झाली आहेत. आतापर्यंत १९ जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. निदर्शकांनी नेत्यांची घर जाळण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. 

आज मंगळवारी सकाळी ११.४० वाजता कपिलवस्तु जिल्ह्यातील कृष्णनगर शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले. त्यांनी टायर जाळून रस्ता रोखला.

PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?

काठमांडूमध्ये मारल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोलघर चौकात दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. निषेधामुळे कृष्णनगरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. सीमेवर भारतीय वाहनांचा प्रवेश तात्काळ थांबवण्यात आला, तर नेपाळी वाहनांची हालचालही मोठ्या प्रमाणात कमी झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सशस्त्र पोलिस दल आणि लष्कराच्या जवानांनी मोर्चा काढला. निषेधाचा थेट परिणाम सीमाशुल्क कार्यालयांवरही झाला. कृष्णनगर सीमाशुल्क कार्यालयाचे मुख्य गेट बंद करण्यात आले आणि तपासणीदरम्यान मालवाहू वाहने जिथे उभी असतात त्या पटांगणाला बंद करण्यात आले. 'कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही, परंतु लोक स्वतः त्यांची मालवाहू वाहने क्लिअर करत नाहीत', असे सीमाशुल्क प्रमुख फदींद्र खतिवडा यांनी स्पष्ट केले.

दुपारी १२.३५ वाजता नेपाळचे कस्टम ऑफिसही बंद झाले, पण ते बंद असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. ऑफिसमध्ये अत्यावश्यक काम सुरू होते.

जर ऑर्डर आली तर सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली जाईल. मंगळवारी दुपारी १२.३५ वाजता नेपाळचे कस्टम ऑफिसही बंद करण्यात आले. आत काही अत्यावश्यक काम सुरू असले तरी ऑफिसच्या बाहेर पूर्णपणे टाळेबंदी होती.

भारतीय पर्यटकांच्या अडचणी वाढल्या

नेपाळ प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीय यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. काकरहवा सीमेवरून नेपाळला जाणाऱ्या सर्व भारतीय पर्यटक वाहनांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. फक्त स्थानिक वाहनांना परवानगी देण्यात येत आहे. याचा थेट परिणाम सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शेकडो यात्रेकरूंवर झाला आहे, हे रूपंदेही जिल्ह्यातील लुंबिनीला जाण्यासाठी निघाले होते.

कालिदह येथील लुंबिनी छोटी भानसार कार्यालय सोमवार संध्याकाळपासून बंद आहे. यामुळे सीमेवर शांतता आहे. बर्हनी, खुनुवा आणि काकरहवा सीमेवर पर्यटकांची वाहने उभी आहेत, यामुळे दोन्ही बाजूंनी लांब रांगा लागल्या आहेत. उष्णता आणि आर्द्रतेमुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Nepal Protest Impact of the agitation in Nepal on the border, the situation is tense on the border; Indian tourists stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ