बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:12 IST2026-04-10T13:11:32+5:302026-04-10T13:12:26+5:30

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी १५ दिवसांतच मंत्री दीप कुमार साह यांना मंत्रिमंडळातून हटवले. पत्नीला फायदा मिळवून दिल्याचा होता आरोप...

Nepal Prime Minister Balen Shah's big decision; Minister dismissed within 15 days | बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी

बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी

नेपाळचे नवे आणि तरुण पंतप्रधान बालेंद्र शाह अर्थात बालेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच आपल्या कडक प्रशासनाची झलक दाखवून दिली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून पत्नीला सरकारी लाभ मिळवून देणाऱ्या मंत्र्याची बालेन शाह यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नेपाळच्याराजकारणात मोठी खळबळ उडाली असून, 'चुकीला माफी नाही' असा संदेशच पंतप्रधानांनी दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

श्रम, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्री दीप कुमार साह यांनी आपल्या पत्नीचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना पुन्हा 'आरोग्य विमा बोर्डा'च्या सदस्यपदी नियुक्त करण्यासाठी आपल्या पदाचा दबाव वापरला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत सत्ताधारी 'राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष'चे प्रमुख रवी लामिछाने यांनी या मंत्र्याविरुद्ध कारवाईची शिफारस केली होती. बालेन शाह यांनी कोणताही विचार न करता साह यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे.

आरोग्यमंत्र्यांनाही दिला डोस

केवळ दीप कुमार साह यांच्यावरच कारवाई करून बालेन शाह थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री निशा मेहता यांनाही कडक समज दिली आहे. साह यांच्या पत्नीच्या पुनर्नियुक्तीच्या प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहिल्याचा ठपका निशा मेहता यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या प्रेस सल्लागार दीपा दहल यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, श्रम मंत्रालयाची धुरा आता पंतप्रधानांनी स्वतःकडे ठेवली आहे.

रॅपर ते पंतप्रधान : बालेन शाह यांचा वाढता दबदबा

रॅपर म्हणून ओळख मिळवलेले बालेंद्र शाह यांनी गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत पारंपारिक राजकीय पक्षांना धूळ चारत विजय मिळवला होता. नेपाळमधील 'जेन जी'च्या आंदोलनानंतर झालेल्या या निवडणुकीत बालेन यांच्या पक्षाने मोठी मुसंडी मारली होती. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरुद्ध लढा देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या बालेन शाह यांनी अवघ्या १५ दिवसांत आपल्याच मंत्र्याला घरचा रस्ता दाखवून आपली प्रतिमा अधिक घट्ट केली आहे.

Web Title : पत्नी के लाभ के लिए नेपाल के पीएम ने मंत्री को बर्खास्त किया, दिखाई सख्ती

Web Summary : नेपाल के पीएम बालेन शाह ने पत्नी को लाभ पहुंचाने के लिए सत्ता का दुरुपयोग करने वाले मंत्री को तुरंत हटा दिया। यह निर्णायक कार्रवाई भ्रष्टाचार के खिलाफ जीरो टॉलरेंस का संकेत देती है और हाल ही में चुनाव में मिली जीत के बाद शाह की छवि को मजबूत करती है।

Web Title : Nepal PM Sacks Minister Over Wife's Benefit, Shows Firm Hand

Web Summary : Nepal's PM Balen Shah swiftly removed a minister for misusing power to benefit his wife. This decisive action signals a zero-tolerance stance against corruption and strengthens Shah's image after his recent election victory.