शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:23 IST

अमेरिकेचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष तथा हवाई दलाचे जनरल डॅन केन म्हणाले, रविवारी फोर्डो तथा इतर लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी 14 बॉम्ब वापरले गेले.

अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर हल्ले चढवून संपूर्ण जगाला चकित केले. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यांबरोबरच, अमेरिकेने इस्रायल-इराण युद्धात प्रत्यक्ष उडी घेतल्याचेही सिद्ध झाले आहे. या हल्ल्यानंतर, 'आपण इराणचा फोर्डो अणुसंवर्धन प्रकल्प उद्ध्वस्त करण्यासाठी बहुचर्चित 'बंकर-बस्टर' बॉम्बचा वापर केला, असेही अमेरिकेने स्पष्ट केले.' खरे तर, हा घातक बॉम्ब अत्याधुनिक स्टील्थ बी२ बॉम्बरच्या सहाय्याने टाकण्यास सक्षम असलेला अमेरिका हा एकमेव देश आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, हा बॉम्ब टाकण्यासाठी अमेरिकेचे बी-२ बॉम्बर्स कोणत्या मार्गाने इराणमध्ये पोहोचले. तर याचा खुलासा खुद्द अमेरिकेनेच केला आहे.

अमेरिकेने इराणवर 14 बॉम्ब टाकले - इराणवरील हल्ल्यानंतर, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यासोबत पत्रकारपरिषदेत बोलताना अमेरिकेचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष तथा हवाई दलाचे जनरल डॅन केन म्हणाले, रविवारी फोर्डो तथा इतर लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी 14 बॉम्ब वापरले गेले. यावेळी त्यांनी एक नकाशाही दाखवला. यात बी-2 बॉम्बर्स विमाने अमेरिकेहून इराणपर्यंत कशी पोहोचली? तो मार्गही दाखवण्यात आला होता. या योजनेची माहती अमेरिका आणि टॅम्पातील फार कमी नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना हाता. या शिवाय, या बॉम्बर्समध्ये हवेतच अनेकवेळा ईंधनही भरण्यात आले.

अमेरिकेतून इराणला कसे पोहोचले अमेरिकन B-2 स्पिरिट बॉम्बर्स -पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेल्या नकाशानुसार, अमेरिकन  बी-2 बॉम्बर्स अमेरिकेतून उड्डाण केल्यानंतर, उत्तर अटलांटिक महासागर पार करून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून इराणमध्ये पोहोचले. अमेरिकेने केलेल्या दाव्यानुसार, या दरम्यान अमेरिकन बॉम्बर्स बराच वेळ आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते. यानंतर त्यांनी, स्पेन आणि उत्तर आफ्रीकेतून भूमध्य सागरावरून उड्डाण केले. यानंतर ही विमाने इस्रायली हवाई हद्दीतून आधी जॉर्डनमध्ये पोहोचले, यानंतर त्यांनी इराक ओलांडला यानंतर त्यांनी इराणच्या अणुकेंद्रांवर बॉम्बिंग केली आणि परत माघारी फिरले.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाIranइराणIsraelइस्रायलwarयुद्ध