Naval base shot dead, many injured in Florida | फ्लोरिडात नौदलाच्या तळावर गोळीबार, अनेक जखमी
फ्लोरिडात नौदलाच्या तळावर गोळीबार, अनेक जखमी

फ्लोरिडा- अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये शुक्रवारी नौदलाच्या तळावर गोळीबार करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. एका बंदुकधाऱ्यानं नौदलाच्या तळावर गोळीबार केला असून, त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये शुक्रवारी एक शूटर नौदलाच्या तळामध्ये घुसला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोळीबार करणाऱ्याला सैनिकांनी ठार केलं आहे. 


एसकॅम्बिया काऊंटीच्या शेरीफ कार्यालयानं ट्विटर एक संदेश दिला आहे. पेनसाकोला स्थित नौदलाच्या तळावर आता कोणीही शूटर सक्रिय नाही. गोळीबार करणाऱ्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे, सर्च ऑपरेशन संपलेलं आहे. परंतु सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.

 

Web Title: Naval base shot dead, many injured in Florida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.