शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर अणुबॉम्बसारखा स्फोट अन् विध्वंस; मोठा उल्कापिंड पृथ्वीवर आदळल्यास कसं असेल चित्र?... NASA ने सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:22 IST

NASA asteroid warning: पृथ्वीला वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे तयारी करण्याची गरज आहे. नासाने या उल्कापिंडाच्या आघाताच्या शक्यतेवर अभ्यास केला आहे.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) आणि युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेने मोठा इशारा दिला आहे. भविष्यात येणाऱ्या वर्षांमध्ये मोठा उल्कापिंड (asteroid ) पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असून पृथ्वी या आघातासाठी तयार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. (In a NASA simulation of an asteroid impact, couldn't stop a space rock from decimating Europe)

पृथ्वीला वाचविण्यासाठी आणि येणाऱ्या या संकटाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे तयारी करण्याची गरज आहे. नासाने या उल्कापिंडाच्या आघाताच्या शक्यतेवर अभ्यास केला आहे. यानंतर या दोन्ही संस्थांनी हा निश्कर्ष काढला आहे. 26 एप्रिलला नासाच्या प्लॅनेटरी डिफेंस कोऑर्डिनेशन ऑफिसने एक पूर्वाभ्यास केला आहे. यामध्ये त्यांनी जर ही उल्का पृथ्वीवर आदळली तर त्याचे काय परिणाम होतील याचा अंदाज वर्तविला आहे. वैज्ञानिकांनुसार सध्यातरी याची शक्यता दूरदूरवर नाहीय. मात्र, भविष्यात अशाप्रकरचा आघात होऊ शकतो. या अभ्यासानंतर नासाने आणि युरोपिय एजन्सीने पृथ्वीला वाचविण्याच्या दिशेने तयारी सुरु केली आहे. 

कपोलकल्पित...सध्यातरी हा अभ्यास कपोलकल्पित उल्केवर आधारित आहे. नासाच्या सेंटरने एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळणार असल्याची कल्पना केली होती. या उल्केला 2021 PDC नाव देण्यात आले होते. ही उल्का 35 मीटर लांब आणि 700 मीटर रुंद होती. या अभ्यासात असे आढळले की, ही उल्का पृथ्वीवर आदळण्याची 5 टक्केच शक्यता आहे. ही उल्का युरोमध्ये आदळू शकते. जर ही उल्का आदळली तर अणुबॉम्बएवढी तिची तीव्रता असणार आहे. एक अणुबॉम्ब जेवढा विध्वंस करू शकतो तेवढा विध्वंस ही उल्का करणार आहे.

पृथ्वीचे संरक्षण कसे करणार?अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी पृथ्वीवर भविष्यात येणाऱ्या संकटाला अंतराळातच उडविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी उल्का पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी तसेच नष्ट करण्यासाठी आण्विक हत्यारे वापरण्याचा पर्याय शोधू लागले आहेत. अण्विक हल्ला करण्याचा सल्ला या वैज्ञानिकांनी दिला आहे.

टॅग्स :NASAनासाEarthपृथ्वी