शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

NASA DART Mission: आता पृथ्वीला अ‍ॅस्ट्रॉइडपासून धोका नाही, नासाचा तो प्रयोग यशस्वी, अंतराळात केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:44 IST

NASA DART Mission: अमेरिकन अंतराळ संस्था (नासा)ने एक अंतराळात अजून एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. नासाने पृथ्वीला वाचवण्यासाठीच्या अभ्यासांतर्गत आपल्या डार्ट मिशनला यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे

वॉशिंग्टन -  अमेरिकन अंतराळ संस्था (नासा)ने एक अंतराळात अजून एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. नासानेपृथ्वीला वाचवण्यासाठीच्या अभ्यासांतर्गत आपल्या डार्ट मिशनला यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे. सोमवारी अंतराळामध्ये २२५०० किमी प्रतितास वेगाने नासाचं अंतराळ यान अशनीवर(अ‍ॅस्ट्रॉईड) आदळलं. या प्रयोगाच्या माध्यमातून नासाला पृथ्वीवर येणाऱ्या अशनींची दिशा बदलता येणार की नाही, याबाबतची चाचपणी करायची होती.  

ही चाचणी २७ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे पाच वाजता सुरू झाली. त्यामध्ये डार्ट नामक नासाचं अंतराळ यान प्रति तास २२ हजार ५०० किमी वेगाने डिमॉरफोस लघुग्रहावर आदळलं. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रयोगामुळे शास्त्रज्ञांना अशनीच्या कक्षा बदलण्याची आणि त्याच्या दिशेत बदल करण्याची अपेक्षा आहे. 

नासाच्या मिशन कंट्रोलच्या एलेना अ‍ॅडम्स यांनी हा प्रयोग यशस्वी झाल्याची घोषणा केली. मात्र नासाचे अंतराळ यान अशनीवर आदळल्यानंतर ही अशनी कुठल्या दिशेने वळली आणि त्यामध्ये किती बदल झाला आहे. याबाबतची आकडेवारी समोर येण्यास काही वेळ लागणार आहे. कारण ही टक्कर झाल्यानंतर डार्टचा रेडियो सिग्नल बंद झाला होता. 

अ‍ॅडम्स यांनी सांगितले की, जिथपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू शकतो त्या अंदाजानुसार आमची पहिला ग्रह संरक्षण चाचणी म्हणजेच पृथ्वीला अ‍ॅस्ट्रॉईडपासून वाचवण्याची आमची चाचणी यशस्वी झाली आहे. मला वाटते आता लोकांना शांत झोपण्यास हरकत नाही, त्यांनी ही घोषणा करताच टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. 

टॅग्स :NASAनासाEarthपृथ्वीInternationalआंतरराष्ट्रीय