कोरोना लॉकडाउनच्या काळात जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले ‘कोविड ब्रायन्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 01:13 IST2020-04-12T01:12:25+5:302020-04-12T01:13:20+5:30
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभर भीषण परिस्थिती ओढवली आहे. या रोगाने लाखाहून अधिक बळी घेतले आहेत. भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ...

कोरोना लॉकडाउनच्या काळात जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले ‘कोविड ब्रायन्ट’
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभर भीषण परिस्थिती ओढवली आहे. या रोगाने लाखाहून अधिक बळी घेतले आहेत. भारत, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे.याच लॉकडाउन दरम्यान जन्मलेल्या मुलीला आईने ‘कोविड ब्रायंट’ असे अजब नाव दिले आहे. एका महिलेने कोरोना महामारीच्या काळात अर्भकाला जन्म दिला. गंमत म्हणजे जग ज्या नावाचा उच्चार ऐकून दचकत आहे, त्या प्राणघातक कोरोना विषाणूचे नाव मुलीला दिले आहे.
अनेकदा पालक आपल्या मुलांसाठी त्यांच्या आवडत्या टेलिव्हिजन मालिका पात्रांतील नावे निवडतात तर कुणी हरविलेल्या प्रियकरांची नावेही निवडतात. परंतु फिलिपिन्सच्या मनिला शहरात एका महिलेने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला ‘कोविड ब्रायन्ट’ असे नाव दिले आहे. १५ मार्च रोजी लॉकडाउन असताना या मुलीचा जन्म झाला. मुलीचे असे नाव ठेवल्याने आईबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच तिचे कौतुकही केले जात आहे. यातील ब्रायन्ट हे नाव आईने लोकप्रिय फूटबॉलपटू कोबे ब्रायन्ट याच्या नावावरून घेतले आहे.