Earthquake in Myanmar : म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या, अनेक बेपत्ता; बँकॉकमध्ये आणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:11 IST2025-03-28T14:11:20+5:302025-03-28T14:11:57+5:30

Earthquake in Myanmar : चीन आणि तैवानच्या काही भागांनाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे....

Myanmar, Thailand hit by major earthquake, many buildings collapsed, many Missing; Emergency declared in Bangkok | Earthquake in Myanmar : म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या, अनेक बेपत्ता; बँकॉकमध्ये आणीबाणी

Earthquake in Myanmar : म्यानमार, थायलंडमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप, इमारती कोसळल्या, अनेक बेपत्ता; बँकॉकमध्ये आणीबाणी

Earthquake in Myanmar : म्यानमारला शुक्रवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. हा धक्का  एवढा तीव्र होता की, तो थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 एवढी मोजली गेली. यात अनेक जण बपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय एवा ब्रिजही कोसळल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही, तर चीन आणि तैवानच्या काही भागांनाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे. 

या भूकंपाची तीव्रता एवढी तीव्र होती की, थायलंड आणि मॅनमारमधील अनेक शहरांतील इमारती अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये टॉवर्स कोसळले आहेत. तर डझनावर लोक बेपत्ता झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर 50 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे USGS चे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, मेघालयातील गारो हिल्समध्येही 4.0 एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले. म्यानमारमधील मांडाले शहरात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे अनेक मंदिरे आणि बौद्ध ठिकानांचेही नुकसान झाले आहे.  

सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत अगदी गगनचुंबी इमारतीही भूकंपाच्या धक्क्याने हलताना अथवा कोसळताना दिसत आहेत. तर अनेक इमारती झुकल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. "आपण म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपानंतरच्या परिस्थितीबद्दल चिंतित आहोत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. आम्ही प्रशासनाला या संदर्भात सतर्क राहण्यास सांगितले आहे. याच बरोबर, परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

याशिवाय, ढाका आणि चितगावसह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. येथे रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 एवढी होती. अद्याप येथून कसल्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
 

Web Title: Myanmar, Thailand hit by major earthquake, many buildings collapsed, many Missing; Emergency declared in Bangkok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.