Myanmar Earthquake: भीषण भूकंपात म्यानमारमधील 'सुवर्ण पॅगोडा' उद्ध्वस्त; भारतानं केला होता जिर्णोद्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:56 IST2025-03-28T15:56:31+5:302025-03-28T15:56:57+5:30
राजा अनवराथा यांच्या आदेशावर त्याचे बांधकाम झाले होते. मांडले पॅगोडाचं भूकंपामुळे नुकसान झाले आहे.

Myanmar Earthquake: भीषण भूकंपात म्यानमारमधील 'सुवर्ण पॅगोडा' उद्ध्वस्त; भारतानं केला होता जिर्णोद्धार
नेपीडॉ - म्यानमारमध्ये आलेल्या ७.७ तीव्रतेच्या भयानक भूकंपाने देशात मोठं नुकसान झाले आहे. आतापर्यंत मृतकांचा आकडा समोर आला नाही. या भीषण भूकंपामुळे मांडले येथील महामुनी पॅगोडा उद्ध्वस्त झाला आहे. २०१६ मध्येही भूकंपामुळे पॅगोडाचं नुकसान झालं होते. भारत सरकारने २०२० साली म्यानमारमधील या नुकसानग्रस्त भूकंपाच्या जिर्णोद्धारासाठी मदत केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रकल्प पूर्ण केला होता.
महामुनी बुद्ध मंदिर नावाने ओळखलं जाणारा हा पॅगोडा म्यानमारमधील प्रमुख तीर्थ स्थळ आहे. संध्याकाळी इथला नजारा अद्भूत असतो. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते परंतु ते पुन्हा एकदा कोसळलं आहे. मांडले महामुनी बुद्ध प्रतिमा म्यानमारशिवाय बौद्ध धर्माला मानणारे लोकांसाठी पवित्र आणि पूजनीय ठिकाण होते. सकाळ, संध्याकाळ मोठ्या संख्येने पर्यटक येथे यायचे. २०१६ च्या भूकंपावेळीही मांडलेतील महामुनी पॅगोडा उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर भारत सरकारच्या मदतीने ते पुन्हा उभारण्यात आले.
PRAY FOR MYANMAR AND THAILAND 🙏
— Inquirer (@inquirerdotnet) March 28, 2025
LOOK: A collapsed building at a construction site is seen in Bangkok, Thailand, on Friday, March 28, 2025, following a magnitude 7.7 earthquake in Myanmar.
A powerful tremor struck central Myanmar on March 28, buckling roads in the capital,… pic.twitter.com/z2jkRil0Jc
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने म्यानमारचं प्राचीन शहर बागानमध्ये १२ पॅगोडाचं जिर्णोद्धार केले होते. ज्यात यूनेस्कोचं जागतिक धरोहर शहरही आहे. म्यानमारमध्ये अनेक जागतिक प्रसिद्ध पॅगोडे आहेत ज्यात श्वेजिगोन पॅगोडाही आहे. म्यानमारमधील हा सर्वात प्रसिद्ध पॅगोडा आहे. हे बाकान शहरात असून त्याला शहराचं हृदय म्हटलं जाते. राजा अनवराथा यांच्या आदेशावर त्याचे बांधकाम झाले होते. मांडले पॅगोडाचं भूकंपामुळे नुकसान झाले आहे.
भूकंपामुळे मांडले शहरात एक मस्जिद कोसळल. ज्यात कमीत कमी २० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे अद्याप याला अधिकृत पुष्टी नाही. म्यानमारची राजधानी नेपीडॉमध्येही भूकंपामुळे रस्त्याचे नुकसान झाले आहे. म्यानमारमध्ये लागोपाठ २ मोठे भूकंप आले. पहिल्या भूकंपानंतर १२ मिनिटांनी दुसरा भूकंप आला. या भीषण भूकंपानंतर म्यानमारच्या ६ भागात आणीबाणी घोषित केली.