बांगलादेशच्या 271 किलोमीटर सीमेवर कब्‍जा...! हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या देशात कोण घालतंय हाहाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 17:16 IST2024-12-12T17:15:06+5:302024-12-12T17:16:48+5:30

महत्वाचे म्हणजे, छोट्या मोठ्या नाही तर, तब्बल 271 किलोमीटर (168 मैल) लांबीच्या सीमेवर या समूहाने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आहे...

myanmar arakan army claims taking control of border with bangladesh Occupy 271 km border of Bangladesh | बांगलादेशच्या 271 किलोमीटर सीमेवर कब्‍जा...! हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या देशात कोण घालतंय हाहाकार?

बांगलादेशच्या 271 किलोमीटर सीमेवर कब्‍जा...! हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या देशात कोण घालतंय हाहाकार?

ज्या बांगलादेशात हिंदूंवर दादागिरी केली जात आहे, अत्याचार केला जात आहे. त्याच बांगलादेशच्या सीमेला गालून असलेल्या मोठ्या भूभागावर म्यानमारमधील एका जातीय सशस्त्र समूहाने कब्जा केला आहे. महत्वाचे म्हणजे, छोट्या मोठ्या नाही तर, तब्बल 271 किलोमीटर (168 मैल) लांबीच्या सीमेवर या समूहाने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आहे.

एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारच्या सैन्यासोबत टक्कर घेणाऱ्या सर्वात शक्तिशाली जातीय अल्पसंख्यक सशस्त्र समूहांपैकी एकाने मौंगडॉच्या शेवटच्या सैन्य चौकीवर कब्जा केल्याचा दावा केला आहे. यामुळे बांगलादेशच्या 271 किलोमीटर लांब सीमेवर त्यांनी संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे. अराकान आर्मीच्या या कब्जामुळे, या समूहाचे रखाइन राज्याच्या उत्तरेकडील भागावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झाले आहे.

रोहिंग्‍यांमध्ये दहशत -
अराकान आर्मीचा राखाइन राज्यावरील कब्जा आणि बांगलादेशला लागून असलेल्या म्यानमारच्या 270 किमी लांबीच्या सीमेवर संपूर्ण ताबा, या वृत्ताने कॉक्स बाजारातील स्थानिक आणि रोहिंग्यांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, टेकनाफ उपजिल्हा प्रशासनाने काल टेकनाफ आणि म्यानमारच्या प्रदेशादरम्यान वाहणाऱ्या नाफवरील वाहतुकीवर प्रतिबंदी घातले आहे.

अराकान आर्मीचा कब्जा -
अराकान आर्मीने (एए) मंगळवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "समूहाने रविवारपासून मौंगडॉच्या संपूर्ण भागाचा ताबा घेतला आहे". येथे गेल्या जनगणनेनुसार, 110,000 हून अधिक लोक राहतात. 

अराकान सैन्याचे प्रवक्ते खिंग थुखा यांनी सोमवारी रात्री उशिरा एका अज्ञात स्थळावरून टेक्स्ट मेसेजच्या माध्यमाने असोसिएटेड प्रेसला माहिती दिली आहे की, त्यांच्या समूहाने रविवारी मौंगडॉमध्ये अखेरच्या सैन्य चौकीवर कब्जा केला आहे. चौकी कमांडर ब्रिगेडियर जनरल थुरिन तुन यांना युद्धातून पळून जाण्याचा प्रयास करताना पकडण्यात आले आहे.

Web Title: myanmar arakan army claims taking control of border with bangladesh Occupy 271 km border of Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.