या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:28 IST2025-08-07T14:28:02+5:302025-08-07T14:28:26+5:30

Spain News: युरोपमधील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या स्पेनमधील एका शहरामध्ये मुस्लिमांना ईद उल फित्र आणि ईद उल अजहा यासारखे धार्मिक सण   सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Muslims banned from celebrating festivals in public places in Spain | या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  

या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  

युरोपमधील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या स्पेनमधील एका शहरामध्ये मुस्लिमांना ईद उल फित्र आणि ईद उल अजहा यासारखे धार्मिक सण   सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बंदी दक्षिण-पूर्व स्पेनमधील मर्सिया येथील जुमिला येथे स्थानिक प्रशासनाकडून लागू करण्यात आली आहे. आता या बंदीवरून वादाला तोंड फुटलं असून, स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या निर्बंधांनुसार, सर्व नागरिक केंद्र, व्यायामशाळा आदी सार्वजनिक ठिकाणी इस्लामिक धार्मिक सण साजरे करता येणार नाहीत. मर्सिया शहरामद्ये लावण्यात आलेले हे निर्बंध स्पेनमधील कुठल्याही शहरात लागू करण्यात आलेले अशा प्रकारचे पहिलेच निर्बंध आहेत. हे निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव पिपल्स पार्टीने मांडला होता. या प्रस्तावावर झालेल्या मतदानावेळी उजव्या विचारसरणीचा वॉक्स पक्ष अनुपस्थित राहिला. तर स्थानिक डाव्या पक्षांनी या प्रस्तावाला विरोध केला. मात्र विरोधानंतरही हा प्रस्ताव पारित केला गेला.

जोपर्यंत स्थानिक अधिकारी स्वत: आयोजन करत नाहीत तोपर्यंत नगरपालिकेच्या क्रीडा सुविधांचा वापर आमच्या पारंपरिक ओळखीशिवाय अन्य धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक कृतींसाठी करता येणार नाही, असे या प्रस्तावावमध्ये म्हटले होते. दरम्यान, या निर्णयाला तीव्र विरोध होत असून. आता या प्रस्तावाला आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे.  हा प्रस्ताव स्पेनच्या राज्यघटनेतील कलम १६चं उल्लंघन करतो. या कलमामधील तरतुदींनुसार नागरिकांना आणि समुदायांना विचारसरणी, धर्म आणि पूजा यांच्या स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या अभिव्यक्तीवर कुठलाही निर्बंध लावला जाऊ शकत नाही.

Web Title: Muslims banned from celebrating festivals in public places in Spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.