Mumbai attack mastermind Hafiz Saeed is finally jerband | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अखेर जेरबंद
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अखेर जेरबंद

लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) तेथील पंजाब प्रांतातून अटक केली. दहशतवादविरोधी न्यायालयासमोर एका खटल्यासाठी हजर होण्याकरिता गुजरनवाला येथून लाहोरला चाललेला असताना त्याला अटक करण्यात आली. त्याला कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या कोटलखपत तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
एलइटी, जमात-उद-दावा, तसेच त्यांच्याशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) या धर्मादाय संस्थेने केलेल्या दहशतवादी कारवाया, तसेच त्यांना पुरविलेली आर्थिक रसद याची चौकशी पाकिस्तानने करावी, असा दबाव जागतिक समुदायाने आणला होता. त्यापुढे अखेर पाकिस्तान झुकला आहे. अशी कारवाई न झाल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता.

English summary :
Mumbai attack mastermind, jamaat ud dawa's leader Hafeez Sayeed was arrested by the Pakistan Anti-Terrorism Department (CTD) from Punjab province on Wednesday. He has been kept in a prison.


Web Title: Mumbai attack mastermind Hafiz Saeed is finally jerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.