शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुल्ला बरादरचा पत्ता कट; हसन अखुंद होणार अफगाणिस्तानचा राष्ट्रपती, 'हे' असतील तालिबान सरकारचे प्रमुख मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 18:02 IST

तालिबानी नेता म्हणाला, मुल्ला हसन 20 वर्षं शेख हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळ होता. तालिबानच्या म्हणण्यानुसार, मुल्ला हसन त्याच्या आधीच्या अफगाणिस्तान सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदांवर होता. (Mullah mohammad hassan akhund to become the new head of afghanistan)

काबूल - तालिबानने अनेक दिवस विचार केल्यानंतर, मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावाची अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती पदासाठी घोषणा केली आहे. द न्यूज इंटरनॅशनलनुसार, बुधवारी तालिबानचे नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे अथवा आणखी काही दिवसांसाठी विलंब होऊ शकतो. तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याने द न्यूजशी बोलताना सांगितले, की अमीरुल मोमिनीन शेख हैबतहुल्ला अखुंजादाने स्वतःच मुल्ला मोहम्मद हसन अखुंदचा रईस-ए-जम्हूर किंवा रईस-उल-वजारा किंवा अफगाणिस्तानच्या नव्या मुखाच्या रुपात प्रस्ताव ठेवला  होता. मुल्ला बरदार अखुंद आणि मुल्ला अब्दुस सलाम हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील.

कंदहारशी संबंध -तीन तालिबान नेत्यांनी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नामांकनाची पुष्टी केल्याचे संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा सध्या तालिबानचे मुख्य निर्णय घेणारी संस्था राहबारी शूरा अथवा नेतृत्व परिषदेचा प्रमुख आहे. तो तालिबानचा जन्म झालेल्या कंदहारचा असल्याचे आणि सशस्त्र चळवळीच्या संस्थापकांपैकी एक आहे, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे. आणखी एक तालिबानी नेत्याने म्हटले आहे, "तो 20 वर्षं राहबरी शूराचा प्रमुख होता आणि त्याने मोठी प्रतिष्ठाही मिळविली." तो सैन्य पार्श्वभूमीपेक्षाही एक धार्मिक नेता म्हणून, चारित्र्यासाठी आणि भक्तीसाठी ओळखला जातो.

विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही! पंजशीरवरील कब्जानंतर तालिबानची धमकी; अमरुल्लाह देश सोडून पळाले

हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळचा -तालिबानी नेता म्हणाला, मुल्ला हसन 20 वर्षं शेख हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळ होता. तालिबानच्या म्हणण्यानुसार, मुल्ला हसन त्याच्या आधीच्या अफगाणिस्तान सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदांवर होता. त्याचप्रमाणे तालिबानने म्हटले आहे की, हक्कानी नेटवर्कचा मुख्य तालिबानी नेता सिराजुद्दीन हक्कानीला संघीय अंतर्गत कामकाजमंत्री म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. पूर्वेकडील प्रांतांसाठी राज्यपालांची नियुक्ती करण्याचा अधिकारही त्यांना असेल. याचप्रमाणे तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद उमरचा मुलगा मुल्ला याकूबला अफगाणिस्तानचा संरक्षण मंत्री करण्यात आले आहे. 

मुल्ला याकूबने वैयक्तिकरित्या अलीकडील सशस्त्र मोहिमेचे नेतृत्व केले आणि जिल्ह्यांसह ग्रामीण भाग काबीज करण्यास सुरुवात केली आणि नंतर देशभरातील प्रांत काबीज करण्याचा निर्णय घेतला.

तालिबानचं सहा 'मित्र' देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण; अमेरिकेचे सर्व 'शत्रू' जमणार!

कुणाला मिळाली इतर मंत्रालये -तालिबानच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदला आता राज्याचा प्रमुख मुल्ला हसन अखुंदचा प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मुल्ला अमीर खान मुत्ताकीला परराष्ट्र मंत्री म्हणून नुयुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

टॅग्स :TalibanतालिबानterroristदहशतवादीTerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तान