शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Afghanistan: तालिबानने गेम केला! मुल्ला बरादरचेच पंख छाटले; राष्ट्राध्यक्ष पदासाठी विश्वासू दहशतवादी निवडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 12:38 IST

Taliban Finalise its Leadership in Afghanistan Govt: राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मुल्‍ला बरादर शिवाय मुल्ला उमरचा मुलगा याकूब, सिराजुद्दीन हक्‍कानी सारखे प्रभावी तालिबानी दहशतवादी कमांडर होते. परंतू हसनने बाजी मारली.

काबूल : पंजशीरमध्ये घमासान युद्ध सुरु असताना तालिबानने इकडे सत्तास्थापनेच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? या प्रश्नावर 2020 मध्ये अमेरिकेशी थेट चर्चा करणारा मुल्ला बरादरचे (mullah baradar) नाव पुढे येत होते. मात्र, तालिबानने मुल्ला बरादरचेच पंख छाटले असून तालिबानचे (Taliban) संस्थापक दिवंगत मुल्‍ला उमरच्या जवळचा सहकारी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. मुल्ला बरादरला आता त्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. (Who is Mullah Hassan Akhund? Taliban's likely to head new Afghanistan govt)

Afghanistan: तालिबान हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mullah Mohammad Hasan Akhund) हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी अर्ज करणार असल्याचे तालिबानच्या तीन प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केले आहे. हसन हा तालिबानची सर्वात शक्तीशाली विंग रहबारी शूराचा प्रमुख आहे. जो गेल्या दीड महिन्यांत कुठेही प्रकाशझोतात आला नव्हता. हसन हा तालिबानचे जन्मस्थान कंदाहरचा आहे. दहशतवादी आंदोलनाच्या संस्थापकांपैकी एक आहे. त्याने रहबारी शूराचे 20 वर्षे नेतृत्व केले आहे. 

Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

मुल्ला हसन हा गेल्या 20 वर्षांपासून शेख हैबतुल्ला अखुंजादाचा खास माणूस आहे. याच वफादारीचे बक्षिस हसनला दिले जाणार आहे. हसनची साधी राहणी आणि मागच्या तालिबान सरकारमधील कामही निवडीसाठी उययुक्त ठरले आहे. 

राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोण कोण होते स्पर्धेत...राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मुल्‍ला बरादर शिवाय मुल्ला उमरचा मुलगा याकूब, सिराजुद्दीन हक्‍कानी सारखे प्रभावी तालिबानी दहशतवादी कमांडर होते. परंतू हसनने बाजी मारली. जर या तिघांपैकी कोणीही राष्ट्राध्यक्ष झाला असता तर हैबुल्‍ला अखुंजादाला आव्हान देण्याची शक्यता होती. याच कारणामुळे या तिघांचे पत्ते कट करून तालिबानने मुल्‍ला हसनची निवड करण्याची खेळी खेळली आहे. हसन हा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत आहे. तर बरादर हा अमेरिकेच्या जवळचा आहे. आता बरादरला हसनच्या हाताखाली उप राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करावे लागणार आहे.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान