शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आई बाळाला विमानतळावर विसरली, प्रसंगावधान राखत वैमानिकाने फ्लाइट मागे वळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 12:57 IST

प्रवासाला निघाल्यावर अनेकजण घाईगडबडीत एखादी वस्तू किंवा सामान सर्रासपणे विसरतात. असे तुमच्याही बाबतीत घडले असेल. मात्र...

जेद्दाह - प्रवासाला निघाल्यावर अनेकजण घाईगडबडीत एखादी वस्तू किंवा सामान सर्रासपणे विसरतात. असे तुमच्याही बाबतीत घडले असेल. मात्र विमानातून परदेशात निघालेली एक महिला चक्क आपल्या मुलालाच विमानतळावर विसरून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, आपण मुलाला विसरून आल्याचे लक्षात आल्यावर संबंधित महिलेने विमानातच आकांत सुरू केला, अखेरीस वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान मागे वळवण्याची परवानगी मिळवली आणि या माय लेकराची पुन्हा भेट घडवून आणली.प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, फ्लाइट एसव्ही 832 हे विमान जेद्दा येथून क्वालालंपूरसाठी रवाना झाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका महिलेले आपले मूल विमानतळावरच राहिल्याचे सांगून रडारड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार कळल्यानंतर वैमानिकाने तातडीने  नियंत्रण कक्षाशी (एटीसी)  संपर्क साधला. या प्रकाराचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. ज्यात अशा प्रसंगी काय करावे असा नियम आहे? अशी विचारणा  एटीसीमधील एक कर्मचारी आपल्या सहकाऱ्याकडे करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर एटीसीमधील कर्मचारी वैमानिकास  विमानात काय चालले आहे हे पुन्हा सांगण्याची विनंती करतात. तेव्हा पायटल सांगतो की, एक महिला आपल्या मुलाला किंग अब्दुल अझीझ इंटरनॅशनल विमानतळावर विसरून आली आहे. तसेच आता पुढील प्रवास करण्यास नकार देत आहे. त्यानंतर एटीसीने सदर वैमानिकास विमान माघारी वळवून पुन्हा उतरण्याची परवानगी दिली. दरम्यान, वैमानिकाने मानवीय दृष्टीकोनातून दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सोशल मीडियामधून कौतुक होत आहे. मात्र आपल्या मुलाला विसरून गेलेल्या बेफिकीर महिलेवर टीका होत आहे. दरम्यान, विमान सुरू झाल्यानंतर नेमकं किती वेळाने सदर महिलेला आपल्या मुलाची आठवण आली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याआधी गतवर्षी जर्मनीमध्येही असा प्रकार घडला होता. तेव्हा एक जोडपे आपल्या मुलीला विमानतळावर विसरून गेले होते.  

टॅग्स :airplaneविमानsaudi arabiaसौदी अरेबिया