लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 05:31 IST2025-09-14T05:17:50+5:302025-09-14T05:31:03+5:30
लंडनमध्ये 'युनाईट द किंगडम' नावाची इमिग्रेशन विरोधी रॅली काढण्यात आली, यामध्ये टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १ लाख १० हजार लोक निदर्शने करण्यासाठी जमले होते. या रॅलीचा उद्देश इमिग्रेशनला विरोध करणे होता.

लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
लंडनच्या मध्यवर्ती भागात शनिवारी ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठे उजव्या विचारसरणीचे निदर्शन दिसून आले. इमिग्रेशन विरोधी कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात १ लाखांहून अधिक निदर्शक एकत्र आले. यावेळी अनेक पोलिस अधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. 'युनाइट द किंगडम' मार्चच्या नावाखाली हा निषेध आयोजित करण्यात आला होता, यामध्ये सुमारे १ लाख १० हजार लोक सहभागी झाले होते.

निदर्शनादरम्यान अनेक अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले. संरक्षक उपकरणे परिधान केलेल्या अधिकाऱ्यांच्या आणि घोडेस्वार पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
ब्रिटनमधील स्थलांतरित हॉटेल्सबाहेर निदर्शनांनी मोर्चाची सुरुवात झाली, सहभागींनी युनियन जॅक आणि लाल-पांढऱ्या सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडे फडकावले. काहींनी अमेरिकन आणि इस्रायली झेंडेही दाखवले. अनेक निदर्शकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' टोप्याही घातल्या. त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर टीका करणारे नारे दिले आणि 'त्यांना घरी पाठवा' असे संदेश लिहिलेले फलकही दाखवले.