Donald Trump on Iran War: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधातयुद्ध छेडले आहे. अयातुल्लाह खामनेई यांच्या मृत्यूनंतर युद्धाचा भडका उडाला आहे. इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात असून, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची चिंता वाढवणारे विधान करत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिले आहेत.
इराणवर हल्ले सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "जोपर्यंत आमचे ध्येय पूर्णपणे साध्य होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार आहेत."
एका व्हिडीओमध्ये संदेशामध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "आमचे लष्करी अभियान पूर्ण ताकदीने सुरू आहे. दुर्दैवाने याचीही शक्यता आहे की आणखी काही अमेरिकेच्या लोकांचे जीव जातील. युद्धात असेच होत असते."
अमेरिका त्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देणार
"ज्या लोकांनी संपूर्ण मानवी सभ्यतेच्या विरोधात युद्ध छेडले आहे, अमेरिका त्या दहशतवाद्यांना सर्वात कठोर शिक्षा देईल आणि ज्या निष्पापांचे जीव गेले आहेत, त्यांचा बदला घेईल", असा इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे.
"मी पुन्हा एकदा रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि इराणच्या सैन्य पोलिसांना आवाहन करतो की, त्यांनी हल्ले थांबवावेत आणि सुरक्षित राहावे. नाहीतर होणाऱ्या मृत्यूंसाठी तयार रहावे", असे म्हणत ट्रम्प यांनी संघर्ष आणखी वाढण्याचे संकेत दिले आहेत.
इराण सत्तांतर गरजेचे आहे
ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तांतर होणे गरजेचे आहे असे म्हणत इराणच्या जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. "सर्व इराणी देशभक्तांना स्वतंत्र व्हायचं आहे. मी त्यांना आग्रहाने आवाहन करतो की, या क्षणी त्यांनी धाडस दाखवावे. त्यांनी साहसी व्हावे आणि त्यांचा देश परत घ्यावा. अमेरिका तुमच्यासोबत आहे", असे ट्रम्प म्हणाले आहेत.
Web Summary : Trump's statement escalates Iran war fears. He vows continued attacks until goals are met, warns of potential American casualties, and urges Iranian regime change, promising US support.
Web Summary : ट्रंप के बयान से ईरान युद्ध का खतरा बढ़ा। उन्होंने लक्ष्य पूरा होने तक हमले जारी रखने, अमेरिकी हताहतों की चेतावनी दी और ईरानी शासन परिवर्तन का आग्रह किया, अमेरिकी समर्थन का वादा किया।