इस्लामाबाद : भारतावर आणखी दहशतवादी हल्ले केले जातील असा इशारा मुंबई हल्ल्याचा (२६/११) सूत्रधार हाफिज सईद याने दिला आहे.जमात-उद-दावा (जेयूडी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या सईदने पठाणकोट हवाई तळावर तुम्ही फक्त एकच हल्ला बघितला. तो हल्ला आणखी चिघळला असता, असे म्हटले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तो बुधवारी सभेत बोलत होता. भारतीय लष्कर काश्मीरमध्ये काश्मिरी लोकांचा नरसंहार करीत असून आपल्या संरक्षणासाठी या काश्मिरींना पठाणकोटसारखे हल्ले करण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा प्रश्न त्याने विचारला. दोन जानेवारी रोजी पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ला आम्ही केला असा दावा युनायटेड जिहाद कौन्सिलचा प्रमुख सईद सलाउद्दीन याने केलाहोता.
आणखी हल्ल्यांची हाफिजची धमकी
By admin | Updated: February 5, 2016 03:13 IST