शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:21 IST

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

ठळक मुद्देजगात 1 लाख 60 हजार 747हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यूस्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवलाइटलीत आतापर्यंत 23 हजार 227 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या शनिवारीही मोठ्या प्रमाणावर वाढली. आतापर्यंत जगात 23 लाख 32 हजार 700 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 60 हजार 747हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या युरोपातच मृतांचा आकडा आता 1 लाखवर जाऊन पोहोचला आहे.

जगभरातील करोनाबाधितांपैकी अर्ध्याहून अधिक लोक एकट्या युरोपातील आहेत. या महामारीमुळे युरोपात 1 लाखहून अधिकल लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 642 जणांचा मृत्यू झाला. स्पेनमध्ये मृतांचा आकडा 20, 043 वर पोहोचला आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

जगाचा विचार करता मृत्यूच्या बाबतीत इटलीचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 39,015 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर येथे गेल्या 24 तासांत तब्बल 1891 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये शनिवारी मृतांच्या आकडा पहिल्यांदाच कमी आला येथे शनिवारी 550 जणांचा मृत्यू झाला.

इंग्लंडमध्ये कोरोनामुळे मरणारांची संख्या 15 हजार 464वर पोहोचली आहे. दिलासादायक गोष्ट ही, की येथे कोरोनामुळे अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

नोबेल पारितोषिक मिळालेले फ्रान्समधील प्राध्यापक लुक मोन्टाग्लिअर यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'कोरोना व्हायरस एड्सवरील उपचार करण्यासाठी वॅक्सीन विकसित करण्याच्या प्रयत्नाचा परिणाम आहे. या व्हायरसच्या जीनोमध्ये असलेल्या एचआयव्ही आणि मलेरियाच्या कीटाणूंचे असणे त्याकडे इशारा करते. कोरोना व्हायरस नैसर्गिक रूपाने तयार झालेला असू शकत नाही'.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीFranceफ्रान्सEnglandइंग्लंडAmericaअमेरिकाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू