शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
4
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
5
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
6
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
7
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
8
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
9
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
10
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
11
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
12
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
13
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
14
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
15
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
16
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
17
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
18
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
19
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
20
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
Daily Top 2Weekly Top 5

केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापूंची रामकथा; PM ऋषी सुनक यांचीही उपस्थिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 15:05 IST

जगातील सर्वात जुन्या केंब्रिज विद्यापीठात कथावाचक मोरारी बापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे.

Morari Bapu: गेल्या काही दिवसांपासून कथावाचक मोरारी बापू चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी देशभरातील बारा ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी रामकथेचे वाचन केले. यानंतर आता त्यांनी थेट जगातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित विद्यापीठ असलेल्या केंब्रिज विद्यापीठात रामकथा सुरू केली आहे. 12 ऑगस्ट रोजी सुरू झालेली रामकथा 20 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 

ऋषी सुनक यांची रामकथेला उपस्थितीकेंब्रिज विद्यापीठातील जीसस कॉलेजमध्ये रामकथा सुरू असून, काल 15 ऑगस्ट रोजी ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या. या रामकथेसाठी मोठ्या प्रमाणावर अनिवासी भारतीय आणि स्थानिक लोकही सहभागी होत आहेत. यावेळी मोरारी बापू फक्त रामकथाच नाही तर जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करत आहेत. 

रामकथेचे आयोजन कोणी केले?केंब्रिजमधील रामकथेचा हा कार्यक्रम ब्रिटनमधील तरुणांनी लॉर्ड डोलार यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर रामकथेचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. सर्व उपस्थितांना शाकाहारी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. कथा ही हिंदू परंपरा आणि केंब्रिज विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना दोन्ही देशांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख होईल.

ब्रिटनमध्ये पहिल्यांदा रामकथा कधी झालीब्रिटनमध्ये बापूंची पहिली कथा 1979 मध्ये झाली होती. 2017 मध्येही वेम्बली अरेना येथे कथेचे आयोजन करण्यात आले होते. आता सहा वर्षांनंतर बापू पुन्हा ब्रिटनमध्ये रामकथा करत आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी बापू पहिल्यांदा यूकेला रामकथा करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी अनिवासी भारतीयांना आपल्या मुलांना मातृभाषेची आणि देशाच्या संस्कृतीची ओळख करुन देण्याचा सल्ला दिला होता. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयRishi Sunakऋषी सुनकIndiaभारतprime ministerपंतप्रधान