२८ फेब्रुवारी रोजी अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण पूर्णपणे कोलमडेल आणि तिथे अमेरिकेच्या मर्जीतले सरकार येईल, असा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, युद्धाच्या ३४ व्या दिवशी चित्र पूर्णपणे पालटले आहे. अयातुल्लांचे पुत्र आणि नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनेई यांनी आपल्या ५ अशा धाडसी निर्णयांनी जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले आहे. खुद्द ट्रम्प यांना आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून माघार घेण्याची भाषा करावी लागत आहे.
ट्रम्प यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजॉम यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्याकडे आता या युद्धातून बाहेर पडण्याचा कोणताही सन्मानजनक मार्ग उरलेला नाही. ट्रम्प यांनी आता इराणला 'पाषाण युगात' पाठवण्याची भाषा सुरू केली आहे, ज्याला तज्ज्ञ त्यांची हतबलता मानत आहेत.
मोज्तबा खामेनेईंचे 'ते' ५ निर्णय ज्यांनी गेम पलटवला:
१. होर्मुझची तात्काळ नाकेबंद
२०२५ च्या युद्धात इराणने १२ दिवस वाट पाहिली होती, पण मोज्तबा यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या ६ दिवसांत 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद करण्याचा आदेश दिला. या एका निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आणि अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला.
२. 'मिस्ट्री मॅन' रणनीती
मोज्तबा यांनी आपले कोणतेही व्हिडिओ निवेदन जारी केले नाही. ते केवळ लेखी आदेश देत आहेत. अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणा त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी टपून बसल्या आहेत, मात्र मोज्तबा यांनी स्वतःला पूर्णपणे भूमिगत ठेवून शत्रूला अंधारात ठेवले आहे.
३. लष्कराचे विकेंद्रीकरण
इराणने आपल्या सैन्याला छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागले आहे. आता प्रत्येक कमांडर स्वतःच्या पातळीवर हल्ल्याचा निर्णय घेऊ शकतो. यामुळे अमेरिकेला एकाच वेळी पूर्ण इराणवर ताबा मिळवणे अशक्य झाले असून युद्ध लांबत चालले आहे, जे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरत आहे.
४. ब्रिटनला दिलेला झटका
अमेरिकेला साथ देणाऱ्या ब्रिटनच्या चागोस बेटावरील तळावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. "आम्ही लांब पल्ल्याची लढाई लढू शकतो," असा संदेश मिळाल्यावर ब्रिटनने या युद्धातून काढ पाय घेतला. यामुळे अमेरिका मित्रराष्ट्रांच्या पाठिंब्याविना एकाकी पडली आहे.
५. माहिती युद्धावर ताबा
मोज्तबा यांनी इराणचा कम्युनिकेशन सेटअप इतका मजबूत केला आहे की, इस्रायल आणि अमेरिकेचा कोणताही प्रोपांडा टिकू शकत नाहीये. जगभरातील इराणी दूतावास सक्रिय असून अधिकृत माहिती तात्काळ प्रसिद्ध केली जात आहे.
Web Summary : Mojtaba Khamenei's strategic decisions, including the Hormuz blockade and decentralized military, forced America to reconsider its stance in the conflict. Britain's withdrawal and control over information warfare further isolated the U.S., leading to a potential stalemate.
Web Summary : मोज्तबा खामेनेई के रणनीतिक फैसलों, जिसमें होर्मुज नाकाबंदी और विकेंद्रीकृत सेना शामिल हैं, ने अमेरिका को संघर्ष में अपने रुख पर पुनर्विचार करने के लिए मजबूर किया। ब्रिटेन की वापसी और सूचना युद्ध पर नियंत्रण ने अमेरिका को और अलग-थलग कर दिया, जिससे संभावित गतिरोध हो गया।