जगात 2024पर्यंत भारत आर्थिक महाशक्ती बनेल - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:44 PM2019-09-05T17:44:24+5:302019-09-05T17:46:55+5:30

'भारत-रशिया संबधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे.'

Modi in Russia updates: India to give $1 billion line of credit for development of Russia's Far East region | जगात 2024पर्यंत भारत आर्थिक महाशक्ती बनेल - नरेंद्र मोदी

जगात 2024पर्यंत भारत आर्थिक महाशक्ती बनेल - नरेंद्र मोदी

Next

व्लादिवस्तोक : जगात भारताला आर्थिक महाशक्ती बनविण्याच्या संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. व्लादिवस्तोक येथील आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,' भारत, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास... यासोबत पुढे जात आहे. 2024 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पुढे जात आहे.'

भारत आणि रशिया सोबत आल्यामुळे विकासाच्या वेगाला  1+1= 11 बनविण्याची संधी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारताच्या काही नेते याठिकाणी येऊन अनेक विषयांवर चर्चा केली. भारत-रशिया संबधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे. त्यामुळे हे संबंध आता केवळ राजकीय संबंध राहिलेले नसून खासगी उद्योगांच्या पक्क्या सहकार्यापर्यंत पोहोचले आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले.  

राष्ट्रपती पुतीन यांचे फार ईस्टच्या प्रती प्रेम आणि व्हिजन हे केवळ या क्षेत्रासाठीच नाही तर भारतासारख्या सहकारी देशांसाठीही मोठी संधी घेऊन आले आहे. व्लादिवस्तोक यूरेशिया आणि पैसिफिकचा संगम आहे. त्यामुळे हा भाग आर्कक्टिक आणि उत्तरी समुद्री मार्गासाठी नव्या संधी निर्माण करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारत आणि फार ईस्टचे नाते हे आजचे नाही, खूप जुने आहे. भारत हा पहिला देश आहे ज्याने व्लादिवस्तोकमध्ये आपले वाणिज्य दुतावास स्थापन केले. त्यावेळी आणि त्यापूर्वीही भारत आणि रशियामध्ये अधिक विश्वास होता. सोवितय रशियाच्यावेळी देखील जेव्हा इतर परदेशी नागरिकांवर व्लादिवस्तोकमध्ये बंदी होती, तेव्हा भारतीयांसाठी प्रवेश खुला होता. असे सांगत हे सहकार्याचे संबंध दोन्ही देशांतील लोकांसाठी सुख-समृद्धीचा मार्ग बनल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

Web Title: Modi in Russia updates: India to give $1 billion line of credit for development of Russia's Far East region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.