पॅरिसमध्ये मॉडेल किम कर्दाशियनवर अज्ञातांनी रोखली बंदूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 12:12 IST2016-10-03T11:57:11+5:302016-10-03T12:12:49+5:30

रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.

Model gun Kim Kardashian gun in Paris | पॅरिसमध्ये मॉडेल किम कर्दाशियनवर अज्ञातांनी रोखली बंदूक

पॅरिसमध्ये मॉडेल किम कर्दाशियनवर अज्ञातांनी रोखली बंदूक

ऑनलाइन लोकमत

पॅरिस, दि. 3 - रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे. पॅरिस फॅशन वीकसाठी सहभागी होण्यासाठी किम पॅरिसमध्ये गेल्या आठवड्यात दाखल झाली आहे. किमसोबत तिची आई क्रिस जेन्नर, बहीण कोर्टनी कर्दाशियन आणि केन्डल जेन्नर देखील आहेत.  ज्या हॉटेलमध्ये किम थांबली होती, तिथे रविवारी पोलिसांच्या वेशात, चेह-यावर मास्क लावलेल्या दोन अज्ञातांनी तिच्या डोक्यावर बंदूक रोखली. सुदैवाने या घटनेत किमला कोणत्याही प्रकारे शारीरिक दुखापत झालेली नाही, अशी माहिती किमच्या प्रवक्त्याने दिली आहे. 
 
किमचा पती या घटनेच्या आदल्या रात्रीच मिडॉस फेस्टिव्हलसाठी न्यूयॉर्कला रवाना झाला होता. मात्र घटनेची माहिती मिळताच कार्यक्रम सोडून तो न्यूयॉर्कला परतला. याबाबतची माहिती मिडॉस एनवायसीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे कॉन्सर्ट पाहायला आलेल्या लोकांसाठी देण्यात आली. 
 

 

Web Title: Model gun Kim Kardashian gun in Paris