टेक्सासमधील ओलिस नाट्य संपले
By Admin | Updated: January 12, 2015 00:51 IST2015-01-12T00:51:56+5:302015-01-12T00:51:56+5:30
अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका रुग्णालयात रुग्णाच्या पित्याने दोन लोकांना ओलिस ठेवले होते. चार तास चाललेल्या ओलिस नाट्यानंतर या पित्याने शरणागती पत्कर

टेक्सासमधील ओलिस नाट्य संपले
ह्यूस्टन : अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील एका रुग्णालयात रुग्णाच्या पित्याने दोन लोकांना ओलिस ठेवले होते. चार तास चाललेल्या ओलिस नाट्यानंतर या पित्याने शरणागती पत्करली. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता या माणसाने दोन लोकांना आपल्या ताब्यात घेतले. रात्री १०.४५ वाजता शरणागती पत्करत त्याने ओलिसांना सोडून दिले.
१५० एकर परिसरात पसरलेल्या टॉमबॉल रिजनल मेडिकल सेंटरमध्ये ही घटना घडली. (वृत्तसंस्था)