पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 20:04 IST2025-11-06T20:02:43+5:302025-11-06T20:04:34+5:30
या वर्षी मे महिन्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत.

पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे जवळचे एक मंत्री सध्या चर्चेत आहेत.ते दहशतवादी हाफिज सईदच्या बंदी घातलेल्या संघटनेच्या जमात-उद-दावा च्या राजकीय शाखेच्या कार्यालयाला त्यांनी काही दिवसापूर्वी भेट दिली होती. यामुळे ते चर्चेत आले आहेत. शाहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी तलाल चौधरी यांनी पंजाबमधील पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगच्या कार्यालयाला भेट दिली, हे हाफिज सईदच्या जमात-उद-दावाची राजकीय शाखा आहे.
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
केंद्रीय गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी लाहोरपासून सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या फैसलाबाद येथील पाकिस्तान सेंट्रल मुस्लिम लीगच्या कार्यालयाला भेट दिली. तिथे पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. तलाल यांच्या भेटीकडे शाहबाज शरीफ सरकारकडून हाफिज सईदच्या राजकीय संघटनेला देण्यात येत असलेले अधिकृत संरक्षण म्हणून पाहिले जात आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद २०१९ पासून लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात आहे. त्याला अनेक दहशतवादी निधी प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे.
या भेटीदरम्यान, पीएमएमएलने एका निवेदनात म्हटले आहे की, तलाल चौधरी यांनी पक्षाच्या नेतृत्वासोबत सविस्तर बैठक घेतली. या चर्चेत सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि प्रमुख राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. दोन्ही बाजूंनी देशातील राष्ट्रीय एकता, राजकीय स्थिरता आणि लोकशाही प्रक्रियांचे महत्त्व यावर भर दिला.
हाफिज सईदच्या कार्यालयात केंद्रीय मंत्र्यांनी पहिल्यांदाच भेट दिली. यापूर्वी, पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांनी कसूर जिल्ह्यात पीएमएमएलच्या रॅलीला उपस्थित राहून हाफिज सईदचे कौतुक केले होते.