शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले २०० लाख कोटींचे खनिज; चीनचा डोळा, दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 07:33 IST

तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर लगेचच चीनने त्यांना मंजुरी देऊन टाकली. 

तालिबानींनी १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा केला. अध्यक्ष अश्रफ घनी रातोरात देशातून पसार झाले. त्यानंतर शेवटचा अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानबाहेर पडण्यापूर्वी बऱ्याच उलथापालथी झाल्या. मात्र, या सगळ्या गदारोळात लक्षात राहिला तो चीनचा कावेबाजपणा. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर लगेचच चीनने त्यांना मंजुरी देऊन टाकली. 

चीनचा डोळा लिथियमवर-

२०० लाख कोटी रुपये  मूल्याचे खनिज अफगाणिस्तानच्या भूमीखाली दडले आहे. या खनिजांमध्ये लिथियमचे प्रमाण सर्वाधिक असून चीनचा त्यावर डोळा आहे. लिथियम-आयर्न बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी लिथियम वापरला जातो. लिथियमसह दुर्मीळ खनिजांवर कब्जा मिळवून जगाची बाजारपेठ आपल्या मुठीत ठेवण्याचा चीनचा इरादा आहे. 

 पाठिंब्याच्या बदल्यात चीनला काय हवे?

चीनच्या शिंकियांग प्रांतातील उघिर मुस्लिमांवर कम्युनिस्ट चीन सरकार अनन्वित अत्याचार करत आहे. तेथील मुस्लिमांना ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) या दहशतवादी संघटनेचा पाठिंबा आहे.  ईटीआयएमने शिंकियांग प्रांताच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे. त्यामुळे चीनच्या दृष्टीने ईटीआयएम शत्रू आहे. तालिबानने ईटीआयएमशी संबंध ठेवू नये, ही चीनची प्रथम अट आहे.

या खनिजांचाही विपुल साठा-

याशिवाय अफगाणिस्तानात दुर्मीळ खनिजांचाही साठा आहे. तसेच तांबे, सोने, नैसर्गिक वायू, लोखंड, कोळसा, बॉक्साइट, हिरे, सल्फर, जिप्सम या खनिजांचाही विपुल साठा आहे.अफगाणिस्तानच्या भूगर्भात दडलेल्या या सर्व खनिज भांडारावर चीनला कब्जा मिळवायचा आहे. म्हणूनच तत्परतेने चीनने तालिबानसमोर मैत्रीचा हात पुढे केला.बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या महत्त्वाकांक्षी योजनेसाठीही चीनला अफगाणिस्तानचा फायदा होणार आहे. पेशावर ते काबूल पक्का रस्ता तयार करून चीन येथून मध्य आशियात व्यापार करू शकणार आहे.  

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानchinaचीन