शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्ट करणार कर्मचाऱ्यांची कपात

By admin | Updated: July 18, 2014 01:57 IST

सॉफ्टवेअर निर्मितीमधील जगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या ताफ्यातील तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे

सिएटल : सॉफ्टवेअर निर्मितीमधील जगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आपल्या ताफ्यातील तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्याचा निर्णय घेतला आहे. तंत्रज्ञान कंपन्यांत अलीकडच्या काळात होणारी ही सर्वात मोठी नोकर कपात आहे. तर कंपनीच्या ३९ वर्षांच्या इतिहासातही ही सर्वात मोठी नोकर कपात मानली जात आहे. कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, अलीकडेच मायक्रोसॉफ्टने नोकिया या एकेकाळी मोबाईल हँडसेट क्षेत्रात दादा असलेल्या कंपनीचा ताबा घेतला होता. यानंतर नोकियाचे सुमारे २५ हजार कंपनी मायक्रोसॉफ्टमध्ये दाखल झाले. यामुळे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख २७ हजार इतकी झाली आहे.नोकियाचा ताबा मिळविण्यासाठी खर्ची पडलेली रक्कम आणि आगामी काळात व्यवसाय करण्यासाठी लागणारा पैसा आणि आता या वाढीव २५ हजार कर्मचाऱ्यांचा पडणारा बोजा लक्षात घेत ही कपात होत असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. यातही, मायक्रोसॉफ्ट आणि नोकिया या दोन्ही कंपन्यांत एकसारख्या स्वरुपाचे काम करणारे हे कर्मचारी असून, पहिल्या टप्प्यात सिएटल येथील १३५१ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)