Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:30 IST2025-11-05T16:29:09+5:302025-11-05T16:30:53+5:30
Man Tries to Touch, Kiss Claudia Sheinbaum: सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने मेक्सिकन राष्ट्रपतींना स्पर्श करण्याचा आणि त्यांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
मेक्सिको सिटीमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांना स्पर्श करून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण मेक्सिकोमध्ये संताप निर्माण झाला असून राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
क्लॉडिया शीनबॉम राजधानीच्या ऐतिहासिक शहराच्या मध्यभागी एका सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांचे स्वागत करत होत्या. त्या रस्त्यावर नागरिकांशी संवाद साधत असताना मद्यधुंद असलेल्या एका व्यक्तीने मागून येऊन त्यांना स्पर्श केला आणि चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असताना काही सेकंदांपर्यंत कोणत्याही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला राष्ट्रपतींपासून दूर केले.
CRAZY moment man GROPES Mexico’s President Claudia Sheinbaum
— RT (@RT_com) November 4, 2025
Then TRIES to kiss her before security finally wakes up
How was security THIS slow to react? pic.twitter.com/vaECXy0bCW
या धक्कादायक घटनेनंतरही, महिला राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांनी संयम राखला. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये त्या व्यक्तीला हळूवारपणे बाजूला ढकलून त्या 'काळजी करू नका',असे हळूवारपणे म्हणत असल्याचे ऐकू येते. क्लॉडिया शीनबॉम या त्यांचे गुरू आणि पूर्वसुरी आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांच्याप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी उघडपणे मिसळण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
क्लॉडिया शीनबॉम कोण आहेत?
क्लॉडिया शीनबॉम यांनी गेल्या वर्षी मेक्सिकोच्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा जन्म १९६२ मध्ये मेक्सिको सिटीमध्ये झाला असून, त्यांनी यापूर्वी शहराच्या महापौर म्हणून काम केले आहे. त्या ज्यू कुटुंबात जन्मलेल्या असून त्यांचे पालक शास्त्रज्ञ होते.