शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

जगातील सर्वात वयोवृद्ध वानराला दयामरण; दोन वर्षांपूर्वी झाली होती ‘गिनीज बुका’त नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 4:24 AM

इंडोनशियाच्या सुमात्रा बेटावर आढळणाऱ्या ओरांगउटांग वानराच्या प्रजातीपैकी जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखल्या जाणा-या ‘पुआन’ या मादीला आॅस्ट्रेलियाच्या पर्थच्या प्राणिसंग्रहालयात सोमवारी दयामरण देण्यात आले.

कॅनबेरा : इंडोनशियाच्या सुमात्रा बेटावर आढळणाऱ्या ओरांगउटांग वानराच्या प्रजातीपैकी जगातील सर्वात वयोवृद्ध म्हणून ओळखल्या जाणा-या ‘पुआन’ या मादीला आॅस्ट्रेलियाच्या पर्थच्या प्राणिसंग्रहालयात सोमवारी दयामरण देण्यात आले. जंगली ओरांगउटांग सुमारे ५० वर्षे जगतात. परंतु ‘पुआन’ ६२ वर्षे जगली. या प्रजातीचे सर्वात वयोवृद्ध वानर म्हणून ‘गिनीज बूका’त पुआनची दोनच वर्षांपूर्वी नोंद झाली होती. (वृत्तसंस्था)>कोण होती ही पुआन?सुमात्रा बेटावरील जंगलात १९५६ मध्ये पुआनचा जन्म झाला. तेथून तिला मलेशियात ठेवले गेले. मलशियाने १९६८ मध्ये पुआन भेट म्हणून आॅस्ट्रेलियास दिली. तेव्हापासून ती प्राणिसंग्रहालयात होती. पुआन ‘ग्रँडओल्ड लेडी’ म्हणून ओळखली जायची. ओरांगउटांग प्रजाती वाचविण्यासाठी कृत्रिम प्रजनन करण्यात पुआन प्रमुख जननी होती. कृत्रिम प्रजनन कार्यक्रमात तिने ११ अपत्यांना जन्म दिला. मुले-बाळे मिळून पुआनचे ५६ वारस अमेरिका, युरोप व अन्य देशांमध्ये आहेत. पुआनच्या काही वारसांना पुन्हा सुमात्राच्या जंगलात सोडण्यात आले. तिचा भागीदार ‘त्सिंग त्सिंग’चा गेल्याच वर्षी मृत्यू झाला.>का दिले दयामरण?वृद्धत्वामुळे थकलेल्या पुआनलाउठता-बसताही येत नव्हते व खाणपिणेही बंद होते. अशा अवस्थेत खितपत पडावे लागू नये म्हणून पशुवैद्यकांनी तिला इंजेक्शनने दयामरण दिले.जागतिक वन्य प्राणी निधीने ओरांगउटांग ही वानराची विलुप्त होण्याचा धोका असलेली प्रजाती म्हणून जाहीर केली आहे. या प्रजातीचे १४,६०० ओरांगउटांग वानर शिल्लक आहेत.> भावपूर्ण आदरांजलीपुआनला चिरनिद्रा देताना प्राणिसंग्रहालयातील कर्मचाºयांचे उर भरून आले व डोळे पाणावले. प्राणिसंग्रहालयाच्या प्रमुख मार्टिना हार्ट यांचा पुआनला आदरांजली वाहणारा मृत्यूलेख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाला. त्यात हार्ट यांनी लिहिले, ‘वाढत्या वयानुसार पुआनच्या डोळ््याच्या पापण्याही पिकल्या, हालचाल मंदावली व तिचे मन अस्थिर झाले. तरीही आदरणीय ‘आजीबाई’च राहिली.मानसन्मान हा तिचा हक्क होता व आम्ही सर्वांनी तो तिला भरभरून दिला. पुआनच्या सहवासात राहून मी संयम शिकले. बंदिवासात असतानाही वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक जंगली चित्तवृत्ती मारता येत नाहीत, हे तिने शिकविले. आम्ही तिला पिंजºयात ठेवले, पण पुआनने स्वत:चे स्वातंत्र्य कधीच गमावले नाही!