पुरुष दिवसातून 19 वेळा करतो सेक्सचा विचार

By Admin | Updated: March 2, 2017 13:40 IST2017-03-02T09:15:11+5:302017-03-02T13:40:15+5:30

काही महिलांना विचाराल तर त्यांच्या मते पुरुषांच्या डोक्यात सतत एकाच गोष्टीचा विचार चालू असतो तो म्हणजे सेक्सचा

Men have sex 19 times a day | पुरुष दिवसातून 19 वेळा करतो सेक्सचा विचार

पुरुष दिवसातून 19 वेळा करतो सेक्सचा विचार

>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 2 - काही महिलांना विचाराल तर त्यांच्या मते पुरुषांच्या डोक्यात सतत एकाच गोष्टीचा विचार चालू असतो तो म्हणजे सेक्सचा. काही लोकांचं म्हणणं आहे की दिवसातून किमान सात वेळा तरी पुरुष सेक्सचा विचार करतात. आता हे कितपत खरं कितपट खोटं हे त्या देवाला आणि पुरुषांनाच माहित. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार पुरुषाच्या मनात दिवसातून किमान 19 वेळा तरी सेक्स संबंधी विचार येत असतात. 
 
(कोर्टाने बलात्का-याला दिली 'नो सेक्स'ची शिक्षा)
(सेक्स करताना कंडोम न वापरल्याने बलात्काराचा गुन्हा)
(पुरुषांपेक्षा महिलांना सेक्समध्ये जास्त आनंद मिळतो - स्टडी रिपोर्ट)
 
या अभ्यासात एक्स्पिरिअंसिंग सॅम्पलिंगचा वापर करण्यात आला. ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीने हे संशोधन केलं असून यासाठी तीन बटण दाबण्यात सांगण्यात आलं होतं. या तीन बटणांमध्ये असणारे पर्याय होते सेक्स, अन्न आणि झोप. दिवसभर आपल्या डोक्यामध्ये सतत काही ना काहीतरी विचार किंवा मंथन चालू असतं त्यामध्ये प्रामुख्याने या तीन गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे हे तीन पर्याय देण्यात आले होते. 
 
'पण हे विचार डोक्यात किती वेळ राहतात हे माहिती करणं थोडं कठीणच आहे. अनेकदा व्यक्तीला आपल्या डोक्यात काय विचार चालू आहेत याची कल्पना नसते. मात्र जेव्हा तो विचार कृतीत उतरतो, तेव्हा त्याला त्याची जाणीव होते', असं युनिव्हर्सिटीमधील अभ्यासात सहभागी झालेल्या टेरी फिशर यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Men have sex 19 times a day