Real life Tarzan: तब्बल 41 वर्ष जंगलातच राहत होता हा मनुष्य; समाजात महिलाही असतात, हेसुद्धा माहीत नव्हतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 03:41 PM2021-06-28T15:41:48+5:302021-06-28T15:45:17+5:30

Real life tarzan : टार्झन चित्रपट आणि गोष्टी आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतीलच. एक आपला मोगलीही होता. तोही जंगलातच राहत होता. मात्र, त्या सर्व भूमिका काल्पनिक होत्या. पण एका व्यक्तीने खरो-खरच असे जीवन जगले आहे. ही व्यक्ती तब्बल 41 वर्षांपर्यंत जंगलातच राहत होती.

Meet the real life tarzan This man lived in the forest for 41 years didn't know that there are women in the society | Real life Tarzan: तब्बल 41 वर्ष जंगलातच राहत होता हा मनुष्य; समाजात महिलाही असतात, हेसुद्धा माहीत नव्हतं!

Real life Tarzan: तब्बल 41 वर्ष जंगलातच राहत होता हा मनुष्य; समाजात महिलाही असतात, हेसुद्धा माहीत नव्हतं!

Next

टार्झन चित्रपट आणि गोष्टी आपण पाहिल्या अथवा ऐकल्या असतीलच. एक आपला मोगलीही होता. तोही जंगलातच राहत होता. मात्र, त्या सर्व भूमिका काल्पनिक होत्या. पण एका व्यक्तीने खरो-खरच असे जीवन जगले आहे. ती व्यक्ती तब्बल 41 वर्षांपर्यंत जंगलातच राहत होती. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीचे नाव ‘हो वैन लैंग’ असे आहे. महत्वाचे म्हणजे, समाजात, जगात महिलाही असतात हेही त्याला माहीत नव्हते. (Meet the real life tarzan This man lived in the forest for 41 years didn't know that there are women in the society)

युद्धाच्या वेळी गेले होते जंगलात - 
हो वैन लैंग 1972 मध्ये व्हियतनाम युद्धाच्या शेवटी जंगलात निघून गेले होते. अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांची आणि आणि दोन भाऊ-बहिनींचा मृत्यू झाला होता.

संपूर्ण जीवन जंगलमय -
ते आपले वडील आणि भावासोबत जंगलातच राहत होते. हे तिघेही पूर्णपणे जंगलावरच अवलंबून होते. मध, फळं आणि इतर जणावरांचे मास हेच त्यांचे खाद्य. स्वतःचे घरही ते स्वतःच तयार करत आणि जंगली जणावरांपासून स्वतःचे संरक्षणही करत. 

VIDEO: वृद्ध महिलेच्या भेटीला आलं माकड; गळाभेट घेतली, डोक्यावरून मायेनं हात फिरवून निघून गेलं

इतर लोकांची वाटायची भीती -
पेशाने फोटोग्राफर असलेले  Alvaro Cerezo यासंदर्भात बोलताना म्हणाले, त्यांनी एखादी बाहेरील व्यक्ती जंगलात पाहिली, की ते घाबरून लपून बसत. अल्वारो सेरेझो यांनी 2015 मध्ये यांचा शोध घेतला. यानंतर त्यांना जंगलातून बाहेर काढून जवळच्याच एका गावात आणण्यात आले. 2016 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत लैंग म्हणाले होते, महिलाही असतात, हे त्यांच्या वडिलांनी त्यांना कधी सांगितलेच नाही.

त्यांना काहीही माहीत नाही -
आजही लैंग यांना पुरुष आणि महिलां यांच्यात फासरा फरक करता येत नाही. सेरेजो म्हणतात, की लैंग यांना कधीही लैंगिक इच्छा झाली नसेल, असा दावा ते करू शकतात. तर लैंग यांचे भाऊ त्रि यांचे म्हणणे आहे, की लैंग याने आपले संपूर्ण आयुष्य जंगलातच घालवले आहे. त्याचे मन अगदी एखाद्या मुला प्रमाणे आहे. त्याला चांगले आणि वाईट लोक यांतील फरकही कळत नाही. लैंग अगदी एक मुलगाच आहे.

 

 

Web Title: Meet the real life tarzan This man lived in the forest for 41 years didn't know that there are women in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.