"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:00 IST2025-10-28T12:57:41+5:302025-10-28T13:00:27+5:30
एकीकडे टॅरिफमुळे ट्रम्प यांचे नाव जगभरात चर्चिले जात असतानाच आता त्यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. एकीकडे टॅरिफमुळे ट्रम्प यांचे नाव जगभरात चर्चिले जात असतानाच आता त्यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. अमेरिकेच्या संविधानानुसार, एखादी व्यक्ती केवळ दोन वेळा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. २०२८ पर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील. मात्र, आता त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, आपण याबद्दल अजून काही विचार केला नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
व्हाईट हाऊसचे माजी अधिकारी स्टीव्ह बॅनन यांच्या सूचनांचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन संविधानातील २२ व्या दुरुस्तीमुळे त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती होण्याची परवानगी मिळत नसली तरी, ते असंवैधानिकरित्या तिसऱ्यांदा राष्ट्रपती होऊ शकतात आणि त्यांना असे करायचे आहे, कारण त्यांच्याकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ आहे.
कोण असेल रिपब्लिकन पक्षाचे भविष्य?
ट्रम्प हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या या नव्या विधानामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून मार्को रुबियो आणि जे.डी. व्हान्स यांची नावे सुचवली आहेत. या विधानावरून स्पष्ट होते की, २०२८च्या निवडणुकीसाठी मार्को रुबियो आणि उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स हे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख उमेदवार असतील आणि त्यासाठी तयारी आधीच सुरू झाली आहे.
"आपल्याकडे काही खूप चांगले लोक आहेत. मला त्यात पुन्हा जाण्याची गरज नाही. त्यापैकी एक इथे उभा आहे," ट्रम्प रुबियोकडे बोट दाखवत म्हणाले. "अर्थातच, जेडी महान आहे. मला नाही वाटत की, कोणीही त्या दोघांविरुद्ध निवडणूक लढवेल. ते दोघेही जिंकू शकतात, पण जर मला संधी मिळाली तर मी निवडणूक लढवीन."
ट्रम्प तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का?
अमेरिकेच्या संविधानानुसार, कोणतीही व्यक्तीपेक्षा अधिकवेळ या पदावर राहू शकत नाही. संविधानात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. तथापि, ट्रम्प यांची इच्छा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विधानांवरून असे वाटत आहे की, ते आता तिसऱ्या टर्मची योजना आखत आहेत.