शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 17:18 IST

इराणच्या राजाई बंदरात झालेल्या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले आहेत.

Iran Massive Explosion:इराणच्या बंदर अब्बास शहरात झालेल्या स्फोटामुळे हाहाकार उडाला आहे. बंदर अब्बास शहरात शनिवारी मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटात ४०६ जण जखमी झाले आहेत. अनेक जखमींना होर्मोज्गान येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   शनिवारी सिना कंटेनर यार्डमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती स्फोट इराणी अधिकाऱ्यांनी दिली. हे यार्ड पोर्ट्स अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशनशी संबधित आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मेहरदाद हसनजादेह म्हणाले की, हा स्फोट विनाशकारी होता.

ओमानमध्ये इराणने अमेरिकेसोबत आण्विक चर्चेचा तिसरा टप्पा सुरू केला असताना हा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात ४०६ लोक जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बचाव कर्मचारी घटनास्थळावर लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. राजाई बंदरात असलेल्या कंटेनरमध्ये हा स्फोट झाला. या कंटेनरमध्ये तेल आणि इतर पेट्रोकेमिकल वस्तू नेल्या जातात. त्यामुळे स्फोटाची तीव्रता जास्त असल्याचे म्हटलं जात आहे.

या भीषण स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा उडाल्या. स्फोटामुळे बंदराशेजारून जाणाऱ्या गाड्यांच्या काचा फुटल्या असून सगळीकडे धुराचे लोट पसरले. या भीषण स्फोटानंतर उडालेल्या हाहाकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावार व्हायरल होत आहेत. या स्फोटामुळे अनेक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर धुराचे ढग तयार झाल्याचे दिसून आले.

"शाहीद राजाई बंदर घाट परिसरात साठवलेल्या अनेक कंटेनरचा स्फोट झाल्यामुळे ही घटना घडली. आम्ही सध्या जखमींना बाहेर काढून वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवत आहोत," असे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले. आग विझविण्यासाठी बंदरातील कामकाज बंद करण्यात आले आहे. बंदरातील कर्मचाऱ्यांची संख्या पाहता या घटनेत अनेक लोक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :IranइराणBlastस्फोटfireआगAccidentअपघात