शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 11:25 IST

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे.मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 38 जण जखमी झाले असून 30 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे.

काठमांडू - नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 38 जण जखमी झाले असून 30 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून दरड कोसळल्या आहेत. तसेच महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक नद्यांचे तट तुटले असून जवळच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे.

नेपाळ आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख बेद निधी खानल यांनी वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, देशात 200 पेक्षा अधिक भागात पावसाचा फटका बसला आहे.  पूरग्रस्त भागात अन्न आणि गरजोपयोगी सामान पोहोचवले जात आहे. तसेच, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. राजधानी काठमांडूमध्ये सुद्धा काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे घर कोसळून झालेल्या घटनेत एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, पूर्वेकडील खोतांग जिल्ह्यात भूस्खलन होऊन आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

आसाममधील पूरस्थिती गंभीर; 14 लाख लोकांना फटकाआसाममधील पूरस्थिती गंभीर झाली असून आणखी तीन जणांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या सहा झाली आहे. 21 जिल्ह्यांतील 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बक्सा जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 850 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गोलाघाट आणि दिमा हसाव जिल्ह्यांत आणखी तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दोन जण गोलाघाट जिल्ह्यात, तर एक जण दिमा हसाव जिल्ह्यात मरण पावला. राज्यातील 21 जिल्ह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे. पुराचा सर्वाधिक फटका बारपेट जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यातील 3.5 लाख लोक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. त्याखालोखाल धेमजी जिल्ह्यातील 1.2 लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. 

 

टॅग्स :NepalनेपाळRainपाऊसDeathमृत्यूAssamआसाम