शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील कपडे घालून व्हिडीओ बनवली; सौदी अरेबियामध्ये फिटनेस ट्रेनरला ११ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 11:48 IST

मनाहेल अल-ओतैबी ही फिटनेस ट्रेनर आहे.

सौदी अरेबियातील अनोखे कायदे सर्वदूर प्रसिद्ध आहेत. इथे दीड वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या एका सौदी महिलेला तेथील विशेष न्यायालयाने ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पण, मानवाधिकार गटांनी सौदी सरकारकडे महिलेच्या सुटकेची मागणी केली आहे. मनाहेल अल-ओतैबी असे या महिलेचे नाव आहे. ही २९ वर्षीय महिला फिटनेस ट्रेनर असून, महिला हक्क या संघटनेची एक कार्यकर्ता देखील आहे. 

खरं तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या कपड्यांचे समर्थन केल्याबद्दल मनाहेल हिला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे त्यांच्या संस्थेचे म्हणणे आहे. एका संयुक्त निवेदनात ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि लंडनस्थित सौदी अधिकार संस्था ALQST ने सांगितले की, २९ वर्षीय फिटनेस ट्रेनर आणि महिला हक्क संघटनेच्या कार्यकर्त्या मनाहेल अल-ओतैबी यांना जानेवारी रोजी राज्याच्या विशेष गुन्हेगारी न्यायालयात गुप्त सुनावणी दरम्यान शिक्षा ठोठावण्यात आली. ९ जानेवारी २०२४ रोजी राज्याच्या विशेष फौजदारी न्यायालयात झालेल्या गुप्त सुनावणीदरम्यान ही शिक्षा सुनावण्यात आली होती. 

दरम्यान, मनहेला अल-ओतैबी यांना तुरुंगात टाकण्याचा निर्णय सौदी सरकारने या प्रकरणाविषयी माहितीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींच्या विनंतीला प्रतिसाद दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर आला. जिनिव्हा येथील सौदी अरेबियाच्या मिशनने जानेवारीमध्ये एका पत्रात म्हटले होते की, अल-ओतैबी यांच्यावर दहशतवादी गुन्ह्यांचा आरोप आहे आणि त्यांना वैध वॉरंट अंतर्गत कायद्यानुसार अटक करण्यात आली होती.

कोण आहे मनाहेल अल-ओतैबी?मनाहेल अल-ओतैबी ह्या एक सोशल मीडिया युजर आहे. त्या इंस्टाग्राम एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि स्नॅपचॅटवर फिटनेसच्या व्हिडीओ पोस्ट करत असत. त्यांच्यावर 'देशात आणि परदेशात राज्याची बदनामी करणे, सार्वजनिक सुव्यवस्था आणि परंपरा आणि समाजाच्या चालीरीतींविरुद्ध बंड पुकारणे आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देणे', असा आरोप आहे. त्यांच्या पोस्टमध्ये महिलांसाठी उदारमतवादी ड्रेस कोड, LGBTQ+ अधिकार आणि सौदी अरेबियाचे पुरुष पालकत्व कायदे संपुष्टात आणणे या बाबींचा उल्लेख होता. त्यांच्यावर असभ्य कपडे परिधान केल्याचा आणि अरबी हॅशटॅग पोस्ट केल्याचा आरोप देखील करण्यात आला, ज्यामध्ये 'सरकार उलथून टाका', असे नमूद होते. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाWomenमहिलाSocial Mediaसोशल मीडिया