अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 09:09 IST2018-11-20T08:46:37+5:302018-11-20T09:09:19+5:30
अमेरिकेतील शिकागो येथील एका हॉस्पिटलमध्ये सोमवारी (19 नोव्हेंबर) अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभार जखमी झाले आहेत.

अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू
अमेरिकेतील शिकागो येथील एका हॉस्पिटलमध्ये सोमवारी (19 नोव्हेंबर) अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात हल्लेखोरासहीत दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिकागो येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये गोळीबाराची घटना घडली असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखाराने हॉस्पिटलच्या इमारतीत प्रवेश करून गोळीबार करायला सुरुवात केली. हल्लेखाराने जवळपास 20 गोळ्या झाडल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच गोळीबारानंतर या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. हल्लेखोराने हा हल्ला का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Suspected gunman dead, officer and 3 others in critical condition following shooting at Chicago hospital, reports The Associated Press quoting Police. #UnitedStates
— ANI (@ANI) November 19, 2018
Chicago police say they are responding to a shooting near a Chicago hospital with “reports of multiple victims.”: The Associated Press #UnitedStates
— ANI (@ANI) November 19, 2018