शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना 'वेगळ्या' नावांनी हाका मारायचा; नोकरी गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:55 IST

Employee lost job: कंपनीने काढून टाकले म्हणून नाराज झालेल्या माईक हार्टलेने मँचेस्टर न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयात सुनावणी झाली. 

ऑफिसमध्ये काम करताना महिला सहकाऱ्यांना (Female Employees) वेगवेगळ्या नावांनी हाक मारण्याची, मस्करी करण्याची सवय अनेकांना असते. परंतू अशा सवयीमुळे ब्रिटनमध्ये एका व्यक्तीला आपली नोकरी गमवावी लागली आहे. हा व्यक्ती महिला सहकाऱ्यांना लव्ह, हनी, स्वीटी  (Love, Honey, Sweetie) अशा नावांनी हाक मारायचा. त्याला कंपनीने काढून टाकले आहे. (man looses job while calling female co worker in office by Love, Honey, Sweetie names.)

या व्यक्तीने याविरोधात न्य़ायालयाचे दार ठोठावले. यामध्ये न्यायालयानेही कंपनीची बाजू घेतली. द सनच्या रिपोर्टनुसार मँचेस्टरमध्ये राहणारा माईक हार्टले हा ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांना दुसऱ्या नावाने हाक मारायचा. या आधीही त्याची तक्रार महिलांनी केली होती. हनी, स्वीटी नावाने हाक मारत असल्याने त्याला कंपनीने काढून टाकले. यावर नाराज झालेल्या माईक हार्टलेने मँचेस्टर न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयात सुनावणी झाली. 

जज पाऊलीन फीनी यांनी कंपनीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत अशा प्रकारे कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना हाका मारणे म्हणजे त्यांचा अपमान करणे आहे. अशा प्रकारच्या नावाने हाका मारणे चुकीचे आहे, असे म्हटले. 

माईकच्या म्हणण्यानुसार तो महिलांनाच नाही तर पुरुष सहकाऱ्यांनाही वेगळ्या नावाने हाका मारायचा. महिलांना पेट नेम ने बोलविण्यामागे चुकीचा विचार नव्हता. यामुळे नोकरीवरून काढून टाकणे चुकीचे आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारीWomenमहिला