समुद्रात मजामस्ती करत असताना सापडला ७ कोटींचा खजिना, आतील मुद्देमाल पाहुन बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:14 PM2021-12-09T14:14:45+5:302021-12-09T14:14:56+5:30

त्येक माणूस लोभी असतोच असं नाही. जगात आजही काही प्रामाणिक लोक आहेत. फ्लोरिडा पोलिसांनी अशाच एका प्रामाणिक व्यक्तीची कहाणी लोकांसोबत शेअर केली. या प्रामाणिक माणसाचे वर्णन करताना फ्लोरिडा पोलिसांनी सांगितलं की, त्याच्या हाती ७ कोटी रुपयांचे ड्रग्ज लागले होते. पण त्याने ते पोलिसांच्या हवाली केले.

man in florida found drugs worth of 7 crore returns to police | समुद्रात मजामस्ती करत असताना सापडला ७ कोटींचा खजिना, आतील मुद्देमाल पाहुन बसला धक्का

समुद्रात मजामस्ती करत असताना सापडला ७ कोटींचा खजिना, आतील मुद्देमाल पाहुन बसला धक्का

Next

पैसा एक अशी गोष्ट आहे जो नात्यात कुटूताही आणतो. पैशापुढे माणूस रक्ताची नातीही विसरतो. अशात अचानक एखाद्याला काहीही न करता करोडो रूपये सापडले तर? यानंतर नक्कीच त्या व्यक्तीचं नशीबच पालटेल. मात्र प्रत्येक माणूस लोभी असतोच असं नाही. जगात आजही काही प्रामाणिक लोक आहेत. फ्लोरिडा पोलिसांनी अशाच एका प्रामाणिक व्यक्तीची कहाणी लोकांसोबत शेअर केली. या प्रामाणिक माणसाचे वर्णन करताना फ्लोरिडा पोलिसांनी सांगितलं की, त्याच्या हाती ७ कोटी रुपयांचे ड्रग्ज लागले होते. पण त्याने ते पोलिसांच्या हवाली केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रामाणिक माणूस फ्लोरिडामध्ये समुद्रकिनारी मजा लुटण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याला पाण्यात अनेक पॅकेट तरंगताना दिसला. हातात जमेल तेवढी पाकिटे गोळा करून तो किनाऱ्यावर आला. किनाऱ्यावर आल्यानंतर त्याने पाकिटांची तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र ही पाकीटे चांगलीच सीलबंद होती. त्या व्यक्तीच्या मनात कोणताही लोभ नव्हता. त्यामुळे त्याने ताबडतोब ही पाकीटे फ्लोरिडा पोलिसांकडे सुपूर्द केली, यानंतर पोलिसांनी ही पाकीटे उघडली.

समुद्रात फेकली गेलेली ही पाकीटे पाहून सगळेच शॉक झाले. पाकिटांमध्ये ड्रग्ज होते. या सर्व पॅकेटमध्ये सुमारे 30 किलो कोकेन होते, ज्याची बाजारातील किंमत सुमारे साडेसात कोटी रुपये आहे. त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनाही आश्चर्य वाटले. तो व्यक्ती हा माल आपल्याजवळ ठेवून गुपचूप त्याची विक्री करून करोडपती होऊ शकला असता. मात्र त्याने पाकीट न उघडता थेट पोलिसांकडे पोहोचवले.

याचवर्षी घडलेल्या एका घटनेत फ्लोरिडामध्ये समुद्राच्या लाटांसोबत सुमारे 11 कोटी किमतीचे कोकेन वाहून आल्याचं आढळून आलं होतं. हे कोकेन सीलबंद पॅकेटमध्ये बंद करून समुद्रात फेकले गेले होते. आता पुन्हा असाच प्रकार समोर आल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत. करोडोंचे ड्रग्ज समुद्रात कोण फेकत आहे? तसेच ही पाकीटे फेकली जात असतील तर प्रत्यक्षात त्यांचा व्यवसाय किती मोठा असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. फ्लोरिडा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: man in florida found drugs worth of 7 crore returns to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.