मैत्रीणीच्या वेदना समजून घेण्यासाठी मित्राने केला 'असा' अभ्यास, जगातल्या सर्वात खतरनाक तुरूंगात डांबलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:06 PM2021-05-03T14:06:00+5:302021-05-03T14:14:32+5:30

वाइस वर्ल्ड न्यूजसोबत बोलताना सोहेला म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा अहमदच्या एका मैत्रिणीला इजिप्तमध्ये गर्भपाताच्या भयानक अनुभवातून जावं लागलं होतं.

A man in Egypt is landed in jail after he was researching on Islamic abortion laws | मैत्रीणीच्या वेदना समजून घेण्यासाठी मित्राने केला 'असा' अभ्यास, जगातल्या सर्वात खतरनाक तुरूंगात डांबलं...

मैत्रीणीच्या वेदना समजून घेण्यासाठी मित्राने केला 'असा' अभ्यास, जगातल्या सर्वात खतरनाक तुरूंगात डांबलं...

googlenewsNext

इजिप्तमधील एका कॉलेज विद्यार्थ्याला अंदाजही नव्हता की, जेंडर स्टडीज केल्यामुळे त्याला तुरूंगात डांबलं जाईल. ऑस्ट्रियाच्या सेंट्रल यूरोपियन यूनिव्हर्सिटीमध्ये सोशिओलॉजी आणि एंथ्रोपोलॉजीचा विद्यार्थी अहमद याला त्याच्या रिसर्चच्या विषयामुळे जगातील सर्वात खतरनाक तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. अहमदची गर्लफ्रेन्ड सोहेला बेल्जिअमध्ये शिकते आणि दोघेही अनेक वर्षांपासून लॉंग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये आहे.

वाइस वर्ल्ड न्यूजसोबत बोलताना सोहेला म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा अहमदच्या एका मैत्रिणीला इजिप्तमध्ये गर्भपाताच्या भयानक अनुभवातून जावं लागलं होतं. तो तिच्या अनुभवामुळे फार इमोशनल झाला होता.
सोहेला म्हणाली की, अहमदने निर्णय घेतला होता की, तो त्याचा मास्टर्सचा रिसर्च इजिप्त आणि इस्लामच्या गर्भपात कायद्याच्या तुलनेवर करेल. अहमद जेव्हा ऑस्ट्रियातून इजिप्तमध्ये परत येत होता तेव्हा शेरम अल शेख इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्याच्या जेंडर स्टडीच्या पुस्तकावरून अधिकाऱ्यांनी त्याला विचारपूस केली.

सोहेला पुढे म्हणाली की, विचारपूस केल्यावर त्याला जाऊ दिलं गेलं. मात्र, एका आठवड्यानंतर त्याच्या घरी पोलीस आले आणि त्याला कायरोतील लिमान टोरा तुरूंगात कैद केलं. या तुरूंगाबाबत सांगितलं जातं की, इथे पॉलिटिकल कैद्यांसोबत अमानवीय कृत्य केलं जातं आणि हा तुरूंग इजिप्तमधील सर्वात जास्त सिक्युरिटी असलेला तुरूंग आहे. 

या तुरूंगाची कंडीशन फार कठोर आहे आणि या तुरूंगातील कैद्यांचा बाहेरील जगाशी काहीही संबंध नसतो. गेल्या काही काळात इथे काही गोष्टी बदलल्या आहेत. अहमदचा परिवार त्याला महिन्यातून एकदा भेटू शकतो. त्याच्यासाठी कपडे आणि जेवण पाठवलं जाऊ शकतं. तुरूंगाच्या नियमांनुसार, सोहेला अहमदला भेटू शकत नाही. कारण दोघांचं अजून लग्न झालेलं नाही.

याआधी अहमदचा मित्र पॅट्रिक जॉर्ज यालाही फेब्रुवारी २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. इटलीच्या युनिव्हर्सिटीमध्ये जेंडर स्टडीजचा अभ्यास करणार जॉर्जवरही अशाप्रकारे दहशतवादाचे आरोप लावण्यात आले होते. यावर्षी एप्रिलमध्ये इटलीतील प्रशासन त्याला सिटीजनशिप मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून जॉर्जला तुरूंगातून बाहेर येण्यास मदत मिळेल.

दरम्यान, सोहेला याप्रकरणी एमनेस्टी इंटरनॅशनल, स्कॉलर्स एट रिस्क, ह्यूमन्स राइट्स वॉच आणि व्हिएनाच्या स्टुडंट यूनियनला भेटली आहे. तिने अहमदच्या सुटकेसाठी विनंती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अहमदच्या सुटकेसाठी बरीच आंदोलने बघायला मिळाली.
 

Web Title: A man in Egypt is landed in jail after he was researching on Islamic abortion laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.