मल्ल्या म्हणाले, ‘मी बिन बुलाये मेहमान नव्हतो’!

By Admin | Updated: June 20, 2016 04:41 IST2016-06-20T04:41:26+5:302016-06-20T04:41:26+5:30

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्तांसह विजय मल्ल्या दिसल्याने यावर चर्चेला तोंड फुटले असले तरी आपण 'बिन बुलाये मेहमान' नव्हे, या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण होते

Mallya said, 'I was not invited to call myself'! | मल्ल्या म्हणाले, ‘मी बिन बुलाये मेहमान नव्हतो’!

मल्ल्या म्हणाले, ‘मी बिन बुलाये मेहमान नव्हतो’!

लंडन : पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्तांसह विजय मल्ल्या दिसल्याने यावर चर्चेला तोंड फुटले असले तरी आपण 'बिन बुलाये मेहमान' नव्हे, या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण होते, असे टिष्ट्वट मल्ल्या यांनी केले आहे.
कोट्यवधींच्या थकीत कर्ज प्रकरणात मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना भारताने फरार घोषित केले आहे. सुहेल सेठ यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गुुरुवारी उच्चायुक्त नवतेज सरना सहभागी झाले होते. याच वेळी येथे मल्ल्या उपस्थित असल्याचे दिसले होते. यावर वाद निर्माण होताच विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले की, मल्ल्या निमंत्रितांच्या यादीत नव्हते. (वृत्तसंस्था)

मी माझ्या लेखक मित्रांसाठी या कार्यक्रमाला गेलो होतो. मुलीसह मी तिथे शांतपणे बसलो होतो आणि कार्यक्रम ऐकत होतो. तथापि, कुठलाही पुरावा नाही, आरोपपत्र नाही अशा वेळी मला माझे कायदेशीर उपाय करण्याची संधी द्यायला नको का?
- विजय मल्ल्या

Web Title: Mallya said, 'I was not invited to call myself'!