शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

पायलटने आत्मघात करून मलेशियाचे विमान समुद्रात बुडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 03:44 IST

टोनी अ‍ॅबॉट; आॅस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचा दावा

सिडनी : कोलांलपूरहून ८ मार्च २०१४ रोजी बीजिंगला जाणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटने आत्मघात करून हे विमान समुद्रात बुडविले, असा त्या देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कयास आहे, असा दावा आॅस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी केला आहे.

या विमानात असलेल्या २३९ प्रवाशांमध्ये चीनच्या नागरिकांची बहुसंख्य होती. हे विमान हिंद महासागरात जिथे कोसळले असा संशय आहे, तेथील १,२०००० किमी परिसरात आॅस्ट्रेलियाच्या पथकाने समुद्राखाली विमानाच्या अवशेषांचा शोध घेतला; पण हाती काहीच न लागल्याने अखेर जानेवारी २०१७ मध्ये ही शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर २०१८ साली अमेरिकेच्या एका खाजगी कंपनीने या विमानाच्या शोधासाठी समुद्रतळात मोहीम हाती घेतली; पण त्यांनाही काहीच सापडले नाही. त्यामुळे हे विमान बेपत्ता कसे झाले असावे याच्या अनेक कहाण्या, दंतकहाण्या गेल्या काही वर्षांत पसरल्या आहेत. पायलट झाहरी अहमद शाह यानेच आत्मघात करून हे विमान समुद्रात बुडविले असावे, असा मलेशियाच्या काही वरिष्ठ अधिकाºयांचा कयास असल्याचे आॅस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी सांगितल्याने खळबळ माजली आहे. मात्र अ‍ॅबॉट यांनी केलेला दावा झाहरीच्या कुटुंबियांनी फेटाळून लावला आहे. अ‍ॅबॉट यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी देणारा पुरावाच उपलब्ध नाही, असे मलेशियाच्या हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे माजी प्रमुख अझरुद्दीन अब्दुल रहमान यांनी म्हटले आहे.तंत्रज्ञानाद्वारे मार्ग बदललाबेपत्ता झालेल्या मलेशिया एअरलाईन्सचा मार्ग हवाई नियंत्रण कक्षातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्हे, तर माणसांच्या निर्देशानुसार बदलण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून झालेल्या चुकांमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीतून काढण्यात आला होता. या विमानातील मृत प्रवाशांमध्ये चार आॅस्ट्रेलियन नागरिकांचाही समावेश होता.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाprime ministerपंतप्रधानairplaneविमान