शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार मीटर उंचीवरून मलेशियाचे विमान कोसळले; २९५ ठार

By admin | Updated: July 18, 2014 03:10 IST

अ‍ॅमस्टरडॅमहून कुआलालंपूर येथे जाणारे मलेशियन एअरलाइन्सचे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळून २८० प्रवासी व १५ विमान कर्मचारी ठार झाल्याचे वृत्त आहे

मॉस्को/ किव्ह : अ‍ॅमस्टरडॅमहून कुआलालंपूर येथे जाणारे मलेशियन एअरलाइन्सचे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळून २८० प्रवासी व १५ विमान कर्मचारी ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र हे विमान अपघातामुळे पडले की ते पाडले गेले याविषयी रात्री उशिरापर्यंत उलटसुलट बातम्या येत होत्या. एमएच १७ या उड्डाणावर असलेल्या विमानाशी युक्रेनच्या हवाई हद्दीत संपर्क तुटला आहे व विमानाचे नेमके काय झाले याची माहिती घेतली जात आहे, असे सांगून मलेशियन एअरवेजच्या प्रवक्त्याने हे विमान कोसळले असावे, यास अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. रशियाच्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, या विमानाने अपेक्षित वेळी आमच्या हवाई हद्दीत प्रवेश केला नाही. त्याआधीच ते सीमेजवळ युक्रेनच्या हद्दीत कोसळले. मात्र युक्रेनच्या गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तावरून या विमानास अपघात झाला नसून ते जमिनीवरून क्षेपणास्त्र सोडून पाडण्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे असले तरी प्रवासी विमानावर हा क्षेपणास्त्र हल्ला नेमका कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. रशियावरही शंकेची छाया हवेत उडणारे विमान क्षेपणास्त्राने पाडण्यासाठी लागणारी अचूक लष्करी निपुणता या भागात फक्त रशियन सेनादलांकडेच असू शकते याकडे संकेत करत युक्रेनमध्ये या हल्ल्यामागे रशियाही असू शकते, अशी शंका अपरोक्षपणे व्यक्त केली जात होती. (वृत्तसंस्था)