शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भडक रंगात पायऱ्या रंगवणाऱ्या मंदिर प्रशासनावर मलेशिया सरकार संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 1:48 PM

मलेशियामध्ये राजधानी क्वालालंपूरच्या बाहेर एका डोंगरामध्ये ही गुहा आहे. त्यासाठी 272 पायऱ्या चढून जाव्या लागतात.

क्वालालंपूर- मलेशियामधील सुप्रसिद्ध हिंदूमंदिर तेथे मोठ्या संख्येने जाणाऱ्या भाविकांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र बाटू केव्ह्जमधील हे मंदिर आता एका वादामध्ये ओढले गेले आहे. हेरिटेज साइट म्हणून ओळख मिळालेल्या मंदिरामुळे मलेशियात एक मोठे पर्यटन केंद्र उभे राहिले आहे. तसेच एका चुनखडकाच्या गुहेमध्ये हे मंदिर आहे. मलेशियामध्ये राजधानी क्वालालंपूरच्या बाहेर एका डोंगरामध्ये ही गुहा आहे. त्यासाठी 272 पायऱ्या चढून जाव्या लागतात. स्थानिक तमिळ लोक व परदेशातून विशेषतः भारतातून जाणारे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. या मंदिरामध्ये दर 12 वर्षांनी उत्सव साजरा होतो. त्यानिमित्ताने या पायऱ्या रंगवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या पायऱ्या अत्यंत भडक आणि वेगवेगळ्या रंगांनी रंगवल्याने बाटू केव्हजच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे असे मत व्यक्त केले जात आहे. मंदिर समितीवर मलेशियन सरकारच्या हेरिटेज विभागाने टीका केली असून आमची परवानगी घ्यायला हवी होती अशी टीप्पणी केली आहे. पायऱ्या रंगविण्यापूर्वी परवानगी न घेतल्याबद्दल मलेशियन सरकारच्या विभागाने नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे हेरिटेज विभागाने मंदिर समितीला नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशियन माध्यमांमध्ये सांस्कृतीक उपमंत्री मुहम्मद बख्तियार वॅन चिक यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. या भडक रंगकामामुळे मंदिराचा हेरिटेज दर्जा जाणार नाही मात्र अशाप्रकारचे मोठे काम करण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी असे त्यांनी सुचविले आहे.बाटू गुहांमधील मंदिरामध्ये तमिळ हिंदू मोठ्या संख्येने भेट देतात. दरवर्षी तेथे थैपुसम नावाचा उत्सव साजरा केला जातो. मुरुगन देवाची भक्ती करण्यासाठी लोक आपल्या शरीरात अनेक टोकदार वस्तू खुपसून घेतात. मलेशियात 3.2 कोटी मुस्लीम आहेत तर 20 लाख लोक भारतीय वंशाचे आहेत. तसेच 70 लाख चीनी लोक आहेत.

 

टॅग्स :MalaysiaमलेशियाHinduहिंदूTempleमंदिर