मलेशियाचे विमान सुदैैवाने बचावले
By Admin | Updated: September 15, 2014 03:57 IST2014-09-15T03:57:57+5:302014-09-15T03:57:57+5:30
मलेशिया एअरलाईन्सच्या मागील संकटाचा ससेमिरा संपलेला दिसत नाही. शनिवारी रात्री हैैदराबादच्या दिशेने निघालेले मलेशिया एअरलाईन्सचे एमएच-१९८ बोर्इंग विमान बिघाडामुळे अर्ध्या वाटेतूनच क्वालालंपूरकडे

मलेशियाचे विमान सुदैैवाने बचावले
क्वालालंपूर : मलेशिया एअरलाईन्सच्या मागील संकटाचा ससेमिरा संपलेला दिसत नाही. शनिवारी रात्री हैैदराबादच्या दिशेने निघालेले मलेशिया एअरलाईन्सचे एमएच-१९८ बोर्इंग विमान बिघाडामुळे अर्ध्या वाटेतूनच क्वालालंपूरकडे वळवावे लागले. रात्री २ वाजता हे विमान क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरले.
आॅटो पायलटप्रणालीत बिघाड झाल्याने हे विमान माघारी परतावे लागले. या बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेवर कोणताही परिणाम झाला नाही. बिघाड लक्षात येताच खबरदारीचा उपाय म्हणून कॅप्टनने विमान माघारी वळविण्याचा निर्णय घेतला, असे मलेशिया एअरलाईन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या विमानाला आग लागल्याचे सोशल मीडियातील वृत्त मलेशिया एअरलाईन्सने तात्काळ फेटाळून लावले आहे. रविवारी दुपारी एमएच-१९८-डी हे विमान हैदराबादकडे रवाना झाले.(वृत्तसंस्था)